तरुणाची दादागिरी! टोल देण्यास नकार देत महिला कर्मचाऱ्याला केली मारहाण; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:57 PM2022-08-22T13:57:11+5:302022-08-22T13:58:17+5:30

एका तरुणाने टोल प्लाझावर काम करणाऱ्या महिलेस मारहाण केली आहे. महिलेने तरुणाकडे टोलची मागणी केली होती. पण त्याने आपण स्थानिक असल्याचं सांगून महिला कर्मचाऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली.

mp toll plaza video man slaps female toll worker when asked to show documents rajgarh bhopal highway | तरुणाची दादागिरी! टोल देण्यास नकार देत महिला कर्मचाऱ्याला केली मारहाण; Video व्हायरल

तरुणाची दादागिरी! टोल देण्यास नकार देत महिला कर्मचाऱ्याला केली मारहाण; Video व्हायरल

Next

मध्य प्रदेशातील राजगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने टोल प्लाझावर काम करणाऱ्या महिलेस मारहाण केली आहे. महिलेने तरुणाकडे टोलची मागणी केली होती. पण त्याने आपण स्थानिक असल्याचं सांगून महिला कर्मचाऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर त्याने टोल कर्मचारी महिलेस शिवीगाळ करत मारहाण केली आहे. मारहाण केल्याची घटना टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजगढ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. तरुणाने टोल देण्यास नकार देत टोल प्लाझावरील महिला कर्मचाऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली होती. आपण स्थानिक असल्यामुळे टोल देणार नाही, असं आरोपीने म्हटलं. हा वाद वाढत गेल्यानंतर पीडित महिलेने टोल प्लाझावरील व्यवस्थापकाला बोलावलं. पण संतापलेल्या आरोपीने पीडित महिलेला शिवीगाळ करत कानशिलात लगावली.


 
टोल प्लाझावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. या प्रकरणी राजगढ पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकारी रामकुमार रघुवंशी यांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: mp toll plaza video man slaps female toll worker when asked to show documents rajgarh bhopal highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.