समलैंगिक पतीची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेली पत्नी, म्हणाली - फक्त 'या' कारणासाठी केलं होतं लग्न...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:28 PM2021-10-06T12:28:42+5:302021-10-06T12:28:55+5:30
पीडितेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिची फसवणूक करून लग्न करून लाखो रूपयांची लुट केली आहे. याची तक्रार तिने आठ महिन्यांआधी एसपीकडे केली होती.
मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये मंगळवारी एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने खुलासा केला की, तिचा पती समलैंगिक आहे आणि तो तिला हुंड्यासाठी सतत त्रास देत असतो. यावरून पीडित महिलेने डीआयजी मनीष कपूरिया यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. पीडित महिलेने तिला पती समलैंगिक असल्याचा पुरावाही डीआयजीकडे दिला आहे.
पीडितेचा आरोप आहे की, तिच्या पतीने तिची फसवणूक करून लग्न करून लाखो रूपयांची लुट केली आहे. याची तक्रार तिने आठ महिन्यांआधी एसपीकडे केली होती. पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करत काहीही कारवाई केली नाही.
महिला इंदुरच्या महालक्ष्मी नगरात राहणारी आहे. महिलेचे म्हणणं आहे की, तिचं लग्न २०१५ मध्ये बॅंकेत कार्यरत दीपक गुप्तासोबत झालं होतं. लग्नावेळी तिच्या परिवारान दीपकच्या परिवाराला दहा लाख रूपये दिले होते. लग्नानंतर तिचा पती तिच्यासोबत राहणं टाळत होता आणि पुन्हा हुंड्याची मागणी करत होता.
त्यानंतर महिलेला तिचा पती समलैंगिक असल्याचा खबर सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या फोटोतून लागली. या फोटोंमध्ये तिचा पती आक्षेपार्ह स्थितीत कुणासोबत तरी होता. महिला म्हणाली की, पती फोटोत ज्या व्यक्तीसोबत आहे तो त्याच्यासोबतच राहतो. त्यानंतर तिला सासरच्या लोकांनी सतत धमकावलं आणि माहेरी पाठवून दिलं.
पीडितेचा आरोप आहे की, पतीने लग्न केवळ हुंड्यासाठी केलं होतं. त्यामुळेच तिला सतत हुंड्यासाठी त्रास दिला जात आहे. दरम्यान शहरात पत्नीद्वारे पती समलैंगिक असल्याची तक्रार केल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे शहरात या विषयाची चर्चा सुरू आहे.