गुन्हेगार नवीन असो वा प्रोफेशनल पोलिसांच्या नजरेतून जास्त दिवस वाचू शकत नाहीत. गुन्हेगार हा शेवटी पकडलाच जातो. भलेही त्याने गुन्हा करण्याची पद्धत इंटरनेटवर शोधली असू देत किंवा क्राइम पेट्रोलसारख्या सीरिअल बघून शोधली असावी. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वाल्हेरमधून (Gwalior) समोर आली आहे. इथे एका पत्नीचा गुन्हा साधारण ६ महिन्यांनंतर समोर आला.
या प्रकरणात सुरूवातीला नशीबाने साथ दिल्यावरही एका पत्नीचा गुन्हा काही केल्या जास्त काळ लपू शकला नाही. पतीच्या पोटात लाथ मारून त्याचा जीव घेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान तरूणाच्या हत्येनंतर त्याच्या मृत्यूचं गुपित उलगडलं गेलं होतं.
कसा झाला पतीचा मृत्यू
पोलिसांनुसार बल्लू उर्फ बलराम चौधरीचा मृत्यू ९-१० एप्रिल दरम्यान रात्री झाला होता. त्यावेळी चौकशी दरम्यान पत्नीने पोलिसांना सांगितलं होतं की, पतीच्या पोटात जोरात दुखत होतं. डॉक्टरकडे घेऊन गेलो तर ते म्हणाले की, त्याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे. पण कुटुंबियांनी पत्नीच्या सांगण्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले.
पत्नीने मान्य केला गुन्हा
एका रिपोर्टनुसार कुटुंबियांच्या तक्रारीनुसार, चौकशी पुढे नेण्यात आली. आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितलं की, पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणं होत होती. त्यांचं आपसात अजिबात पटत नव्हतं. सुरूवातील पोस्टमार्टम रिपोर्टवर कुणीच लक्ष दिलं नाही. पण मृतकाचे नातेवाईक सतत पोलिसांकडे चौकशीची मागणी करत होते.
अशात पोलिसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट पुन्हा पाहिला तर समजलं की, तरूणाचा मृत्यू पोटात मार लागल्याने झाला आहे. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा पत्नीने मान्य केलं की, घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. पत्नीने सांगितलं की, 'त्या दिवशी माझा पती मला दिवसभर मारत होता. त्यावेळी मला वाचवणारं कुणीच नव्हतं. त्यामुळे मी सुद्धा त्याला लाथा - बुक्क्या मारल्या तर त्याचा मृत्यू झाला'.