प्रेयसीच्या पतीचा मृतदेह 2 दिवस जंगलात जाळत होता प्रियकर, असा झाला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 02:30 PM2023-02-17T14:30:55+5:302023-02-17T14:31:27+5:30
Crime News : प्रकरणाची चौकशी करण्यादरम्यान पोलिसांना मोनूच्या पत्नीवर संशय आला. तिची चौकशी केली गेली तेव्हा तिने लव्ह अफेअरमध्ये पतीची हत्या केल्याचं कबूल केलं.
Crime News : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भिंडमध्ये एका प्रियकराने प्रेयसीच्या पतीची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जंगलात नेऊन दोन दिवस जाळला. नंतर पुरावे मिटवण्यासाठी मृतदेहाचे अवशेष चंबल नदीमध्ये फेकले. पण चौकशी दरम्यान मृत व्यक्तीच्या पत्नीवर पोलिसांना संशय आला होता.
कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पत्नीच्या प्रियकरासहीत 5 लोकांना अटक केली आहे. कोट परोसा गावात राहणारा मोनू 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. परिवारातील लोकांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.
प्रकरणाची चौकशी करण्यादरम्यान पोलिसांना मोनूच्या पत्नीवर संशय आला. तिची चौकशी केली गेली तेव्हा तिने लव्ह अफेअरमध्ये पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी रेखाच्या सांगण्यावरून प्रियकर आणि इतर लोकांना अटक केली.
चौकशीतून समोर आलं की, मोनूचं लग्न रेखा तोमरसोबत झालं होतं. पण रेखा लग्नाच्या आधीपासून अनुरागवर प्रेम करत होती. रेखाने आपल्या हातावर अनुरागचा A सुद्धा गोंदवला होता. यावरून रेखा आणि तिचा पती मोनूमध्ये नेहमीच भांडण होत होतं.
रेखाला तिचं पहिलं प्रेम हवं होतं त्यामुळे तिने रोजच्या भांडणाला नेहमीचं संपवण्यासाठी प्लान केला. यात तिला तिचा प्रियकर आणि काही लोकांनी मदत केली.
रेखाचा पती मोनू काही दिवसांसाठी भिंडमधून बाहेर गेला होता. 9 फेब्रुवारीला रेखाचा पती परत येणार होता तेव्हा याची सगळी माहिती रेखाने अनुरागला दिली होती. अनुरागने प्लान केला आणि ग्वाल्हेर स्टेशनवर पोहोचला.
इथे मोनू जसा रेल्वेतून उतरला आणि भिंडला जाण्यासाठी बसमध्ये बसला तेव्हा अनुरागही त्या बसमध्ये चढला. अनुरागने मोनूसोबत संवाद साधला आणि मैत्री केली. अनुरागने मोनूला विश्वास दिला की, तो कारने मेहगांववरून मुरैना जात आहे. रस्त्यात येणाऱ्या मोनूच्या गावाला तो त्याला सोडून देईल.
मोनूनेही अनुरागवर विश्वास ठेवत त्याच्या कारमध्ये बसला. त्यानंतर अनुरागने आपल्या तीन साथीदारांसोबत मिळून मोनूचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मोनूचा मृतदेह पांडरीच्या जंगलात नेऊन जाळला.
अनुराग दुसऱ्या दिवशी जंगलात पोहोचला आणि त्याने पुन्हा एकदा मोनूचा मृतदेह जाळला. त्यानंतर मृतदेहाचे अवशेष चंबलच्या नदीमध्ये नेऊन फेकले. पोलिसांनी अनुराग आणि मृतकाच्या पत्नीसहीत 5 आरोपींना अटक केली आहे.