डीएनए टेस्टमुळे समोर आली गॅंगरेपची खोटी कहाणी, महिलेला मिळाली १० वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 05:16 PM2021-10-28T17:16:09+5:302021-10-28T17:17:12+5:30
पोलिसांनी सांगितलं की, महिलेने ऑगस्ट २०१४ मध्ये पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात गुन्हा दाखलही केला होता.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Crime News) अशोकनगर जिल्हा कोर्टाने सामूहिक बलात्काराची (Fake Gang Rape Case) खोटा तक्रार दाखल करणाऱ्या ४५ वर्षीय महिला आणि तिच्या साथीदाराला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच कोर्टाने दोन्ही आरोपींना २-२ हजारांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने महिलेला ही शिक्षा डीएनए टेस्टच्या आधारावर दिली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, महिलेने ऑगस्ट २०१४ मध्ये पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात गुन्हा दाखलही केला होता. पोलिसांनी चौकशी केली आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांचीही चौकशी केली. आरोपींनी पोलिसांकडे डीएनए टेस्टची मागणी केली होती. याला पोलिसांनी परवानगी दिली होती.
रिपोर्टमधून समोर आलं की, महिलेसोबत आरोपींचा डीएनए मॅच होत नव्हता. दुसरीकडे पोलिसांना गोपाल नावाच्या व्यक्तीवर संशय़ आला. पोलिसांनी गोपाल आणि एका इतर व्यक्तीची डीएनए टेस्ट केली. ही टेस्ट महिलेसोबत मॅच झाली. यानंतर महिला आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी कोर्टाने दोन्ही आरोपीना १० वर्षाची शिक्षा सुनावली.
अशोकनगरमधील आणखी एक घटना
इथे एका तरूणाने आपल्या मित्रासोबत मिळून आपल्या १४ वर्षीय मावस बहिणीवर अनेक महिने गॅगरेप केला. यातून पीडिता गर्भवती झाली होती. अल्पवयीन मुलीने प्रसुतीनंतर बाळाला विहिरीत फेकलं होतं. तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला होता. पोलिसांनी गॅंगरेप प्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे. यातील दोन अल्पवयीन आहेत. बाळाच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठवलं आहे.
.