Shocking! मामीसोबत भाच्यांनी केला गॅंगरेप, खोटं सांगून महिलेला जंगलात घेऊन गेले होते आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:33 PM2021-07-29T13:33:22+5:302021-07-29T13:42:23+5:30

रोजरोजच्या ब्लॅकमेलिंगला (Blackmailing) कंटाळून महिलेने बुधवारी पतीसोबत पोलिसात तक्रार नोंदवली. आरोपी फरार झाले असून दोन्ही आरोपी आणि पीडित महिलेत मामी-भाच्यांचं नातं आहे.

MP : Women gang rapped in city by Nephew in Gwalior | Shocking! मामीसोबत भाच्यांनी केला गॅंगरेप, खोटं सांगून महिलेला जंगलात घेऊन गेले होते आरोपी

Shocking! मामीसोबत भाच्यांनी केला गॅंगरेप, खोटं सांगून महिलेला जंगलात घेऊन गेले होते आरोपी

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Gang Rape) ग्वालियर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोन तरूणांनी आपल्या मामीसोबत गॅंगरेप केला. दोघे तरूण महिलेला पतीचा अपघात झाल्याचं सांगत जंगलात घेऊन गेले होते आणि तिथे त्यांनी तिच्यासोबत अत्याचार (Gang Rape) केला. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. पण रोजरोजच्या ब्लॅकमेलिंगला (Blackmailing) कंटाळून महिलेने बुधवारी पतीसोबत पोलिसात तक्रार नोंदवली. आरोपी फरार झाले असून दोन्ही आरोपी आणि पीडित महिलेत मामी-भाच्यांचं नातं आहे.

भारत मार्केट भागात राहणारी २४ वर्षीय महिलाने महाराजपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तिचा पती नेहमीच रात्री ऑटोरिक्षा चालवतो. महिलेने आरोप लावला की, तिच्या शेजारी राहणारा अरविंद माहौर आणि सोनू माहौर फॅक्टरीमध्ये काम करतात. नात्यामुळे दोघेही तिला मामी म्हणून हाक मारतात. साधारण दोन महिन्यांपूर्वी पती रात्री ऑटो घेऊन गेला होता. त्यानंतर थोड्याच वेळात अरविंद आणि सोनू तिच्या घरी पोहोचले होते. (हे पण वाचा : सैराटची पुनरावृत्ती! वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून अपहरण करत वडिलांनीच केली लेकीची हत्या)

दोघांनी सांगितलं की, मामाचा अपघात झाला आहे. दोघांच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून ती त्यांच्यासोबत गेली. दोघेही तिला महाराजपुऱ्यातील जंगलात घेऊन गेले आणि धमकावून त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर याबाबत कुणाला सांगितलं की पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकीही तिला दिली. त्यानंतर तिला त्यांनी सोडून दिलं.

बुधवारी महाराजपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून महिलेने घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. महिलेने पोलिसांना सांगितलं की, बदनामी होईल म्हणून ती दोन महिने गप्प राहिली. पण दोन्ही आरोपी तिला सतत ब्लॅकमेल करत होते. रोज तिच्यावर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते. मनाई केल्यास पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होते. सोबतच समाजात बदनामी करण्याचीही धमकी देत होते.

महिलेने सांगितलं की, दोघांच्या भीतीने तिने घरातून बाहेर निघणंही बंद केलं होतं. महाराजपुरा सीएसपी रवि सिंह भदौरियाने सांगितलं की, महिलेच्या तक्रारीवरून  दोन्ही आरोपीं विरोधात अपहरण आणि गॅंगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांना लवकरच अटक केली जाईल.
 

Web Title: MP : Women gang rapped in city by Nephew in Gwalior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.