लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लग्नापूर्वी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्याच्याच पत्नीने पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. पंकज तडस याचे काही वर्षांपूर्वी वर्ध्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्यांनी ६ ऑक्टोबर २०२० ला लग्न केले. ते दोघेही देवळीचे घर सोडून वर्धा येथे राहत होते. दरम्यानच्या काळात पंकज याने तिला बेदम मारहाण करून घरातून हाकलल्याचा आरोप पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीवर वर्धा पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, असे नमूद करून तिने थेट नागपुरात पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलीस महानिरीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीत पंकजशिवाय खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. मुलाने केले परस्पर लग्नमुलाने घरच्या कोणालाही विश्वासात न घेता परस्पर लग्न केले. यावर आम्ही कुठलाही आक्षेप न घेता मुलीला स्वीकारण्याची तयारी दर्शविली. परंतु, दोघांनीही देवळी सोडून वर्धा येथे राहण्याचा निर्णय घेतला होता. - रामदास तडस, खासदार, वर्धा