मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणाची (Mukesh Ambani Bomb Scare) लिंक दिल्लीच्या तिहार जेलपर्यंत लागल्याने गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत तुरुंगात छापेमारी करण्यात आली. यामध्ये खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरच्या बराकीतून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. (Mobile seized from Tihar jail in mukesh ambani bomb scare case.)
सुरक्षा दलांनी जेल नंबर-8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आला होता. तहसीन अख्तर हा पटनाच्या गांधी मैदानातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये बॉम्ब स्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोट आणि बोधगया बॉम्बस्फोटामध्ये सहभागी होता.
तहसीन अख्तरच्या बराकीमध्ये जो मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये टोर ब्राऊजरद्वारे व्हर्च्युअल नंबर बनविण्यात आला होता. याच नंबरवरून टेलिग्राम अकाऊंट बनविण्यात आले होते. यानंतर धमक्यांचे पोस्टर तयार करण्यात आले. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेल तहसीन अख्तरला रिमांडवर घेून चौकशी करणार आहे.
चौकशीदरम्यान ती लिंक “उपलब्ध नाही” म्हणून आढळले, त्यामुळे तपास करणार्यांना हे कोणीतरी त्रास देण्यासाठी कृत्य करत असल्याचा संशय आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर २८ फेब्रुवारीला जैश-उल-हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला आणि घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला गेला. या प्रकरणातील तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. नंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सुपूर्द केला. त्यानंतर देखील या प्रकरणाचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA कडे वळविण्यात आला आहे.