शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

मुंबईतून मोठी बातमी! BKCमधून सुरु होतं कोट्यवधींचं ड्रग्ज रॅकेट; १० कोटींची एमडी जप्त

By मनीषा म्हात्रे | Published: March 20, 2023 9:48 PM

गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वांद्रे पुर्वेकडील वांद्रे -कुर्ला संकूल (बीकेसी) येथून चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना बेड्या ठोकण्यास अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी पथकाला यश आले आहे. त्रिकूटाकडून १० कोटींचे ५ किलो १९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कमरुद्दीन शेख, रियाज अन्सारी आणि सलमान खान या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सलमान हा जामिनावर बाहेर असताना ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी परिसरात मोठ्याप्रमाणात ड्रग्ज साठा करण्यात आला असून येथून मोठ्या  ड्रग्ज खरेदी-विक्री आणि पुरवठा केला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे वरळी युनिटचे प्रभारी पोनि संदिप काळे, सपोनि संतोष साळुंखे, सपोनि अमोल कदम, पोउपनि शैलेश देसाई, पोउपनि रविंद्र सावंत आणि पथकाने शुक्रवारी रात्री बीकेसी परिसरात गस्त सुरु केली. बीकेसी अग्निशमन केंद्राजवळ तीन संशयित या पथकाला दिसले. पथकाने सापळा रचून कमरुद्दीन, रियाज आणि सलमान या तिघांनाही ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये यातील कमरुद्दीन आणि रियाज यांच्याजवळ १६० ग्रॅम एमडी पोलिसांना सापडले. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.            कमरुद्दीन आणि रियाज यांना सलमान याने हे ड्रग्ज पुरवले असल्याची माहिती गुन्ह्याच्या तपासात समोर आली. त्यानुसार पोलिसांनी बीकेसी येथेच छापेमारी करुन सलमानने लपवून ठेवलेले आणखी ४ किलो ७४९ ग्रॅम एमडी जप्त केले.  याप्रकरणी अटक आरोपींकडे अधिक तपास सुरु आहे....सलमान अभिलेखावरील आरोपीसलमान हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात २०२१ मध्ये नागपुरमध्ये वाणिज्य स्वरूपाचा गुन्हा दाखल होता.  या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात सक्रीय झाल्याची माहिती गुन्हेशाखेच्या तपासात समोर आली आहे. त्यानुसार या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तिन्ही आरोपींकडे कसून चाैकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MumbaiमुंबईDrugsअमली पदार्थ