शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

Mumbai Cruise Drugs Case: आर्यन खानची रात्र तुरुंगात; आज जामीन मिळणार का? सगळ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 5:40 AM

आलिशान जहाजावर ‘एनसीबी’ची धडक कारवाई; आठ जण अटकेत; बड्या उद्योगपतींच्या मुलींचाही समावेश, अटक झालेल्यांची नावे : आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंह, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर व गोमित चोप्रा

मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात आलिशान जहाजावर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. शाहरुखच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी अटक झाल्याचे समजताच बॉलीवूडसह देशभरात खळबळ उडाली. सर्व आरोपींना रविवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची कोठडी सुनावली. उर्वरित पाच जणांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

दरम्यान, आर्यन खानतर्फे ॲड. सतीश माने-शिंदे यांनी कोर्टात बाजू मांडली. ‘एनसीबी’ने दोन दिवसांची कोठडी मागितल्यावर त्यांनी आर्यनवरील कलमे जामीनपात्र असल्याचा बचाव केला. मात्र, कोर्टाने तो अमान्य केला. आर्यनच्या जामिनासाठी सोमवारी अर्ज केला जाणार आहे. अलीकडेच गुजरातच्या मुंद्रा-अदानी बंदरावर जप्त केलेल्या १५ हजार कोटी रुपये मूल्याच्या ड्रग्जचा व कॉर्डेलियावरील ड्रग्ज पार्टीचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे. 

पथकाने अशी केली कारवाईमुंबईहून गोव्याला दोन दिवसांच्या सफरीवर निघालेल्या कॉर्डेलिया या आलिशान जहाजावर अमली पदार्थांचे सेवन केले जाणार असल्याची खबर ‘एनसीबी’ला मिळाली. त्यानुसार ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. २२ जणांच्या पथकाने जहाजावर प्रवासी म्हणून प्रवेश मिळवला. जहाजावर शनिवारी दुपारनंतर प्रवासी वाढू लागले. एका खोलीत ‘म्युझिक नाइट’ आणि ड्रग्ज पार्टीची जोरदार तयारी सुरू झाली. त्याच वेळी पथकाने आपली खरी ओळख दाखवत छापा टाकून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

आरोपींकडून काय जप्त? १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, एक्स्टसीच्या २२ गोळ्या आणि १ लाख ३३ हजार रुपये रोख. सर्वांचे मोबाइल. 

कोणत्या कलमांखाली अटकआर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस ॲक्ट) कलम २७ (अमली पदार्थांचे सेवन करणे) ८ क (अमली पदार्थांचे उत्पादन, तयार करणे, बाळगणे, खरेदी किंवा विक्री करणे) तसेच अन्य संबंधित तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ‘एनसीबी’ने दिली. मूनमून व सारिका या दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचे समजते. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, चरस तसेच अन्य काही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

आठ तास चौकशी 

रविवारी पहाटे साडेतीन वाजता छापासत्र संपल्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना ताब्यात घेऊन अधिकारी ‘एनसीबी’च्या बॅलार्ड पीअर येथील कार्यालयात आले. आर्यन खान याने सुरुवातीला ड्रग्ज पार्टीशी आपला संबंध नसल्याचे सांगत बचावाचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीनंतर आर्यनने सहभागाची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या सगळ्यांची तब्बल आठ तास चौकशी चालली. ड्रग्ज पार्टीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आठही जणांवर अमली पदार्थ सेवन व बाळगल्याच्या आरोपावरून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वांची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर अटकेची कारवाई करून रविवारी सायंकाळी सर्व आरोपींना किल्ला न्यायालयात नेण्यात आले. शनिवारी रात्री सुरू झालेली ‘एनसीबी’ची कारवाई १२ तास चालली. 

 

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीAryan Khanआर्यन खानbollywoodबॉलिवूड