मुंबई क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणावर आर्यन खानच्या (Aryan Khan) जामिनाची सुनावणी दोन दिवस सुरु होती. वेळ न पुरल्याने न्यायालयाने (Court) 20 तारखेला निर्णय देण्याचे म्हटले. परंतू 20 ऑक्टोबरला देखील आर्यन खानला जामिन मिळण्याची शक्यता कमी दिसू लागली आहे. इथेही वेळ आडवी आली आहे. (Aryan Khan bail)
आर्यन खानच्या वकिलांसोबत मुनमुध धमेचा आणि अरबाज मर्चंट यांचे वकीलही न्यायालयात हजर होते. मुनमुनचे वकील कासिफ खान यांच्यानुसार सेशन कोर्टाचे जज व्ही व्ही पाटील यांनी माझ्याकडे खूप काम आहे. परंतू मी आर्यन खानच्या जामिनावर 20 तारखेला सकाळी लवकरात लवकर निर्णय देण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले.
आठ आरोपींच्या वकिलांनी त्यांची त्यांची कागदपत्रे दाखल केली आहेत. युक्तीवाद केला आहे. सर्वाचे म्हणणे रेकॉर्डवर घेणे हे देखील एक आव्हानात्मक काम आहे. यासाठी वेळ लागणार आहे. आज सायंकाळचे 5 वाजले तरी देखील वकिलांचा युक्तीवाद संपत नव्हता. न्यायालयाकडे देखील वेळ नव्हता. दिवसभराचा युक्तीवाद न्यायालयाला नोंद करून घ्यावा लागणार आहे. त्यावर विचार करावा लागेल. यामुळे हा निर्णय 20 तारखेसाठी राखून ठेवण्यात आला आहे. तरीदेखील पाटील यांनी बिझी असल्याचे सांगितल्याने आर्यन खानला 20 तारखेला तरी जामिन मिळतो का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
आज काय घडले...एनसीबीने आर्यन खानवर ड्रग संबंधी चॅट, आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांशी संबंध आदी गंभीर आरोप केले. तसेच त्याच्याविरोधात ठोस पुरावे आहेत असे देखील न्यायालयात सांगितले आहे. आरोपींपैकी एकाला जरी जामिन मिळाला तरी देखील या प्रकरणातील पुरावे, साक्षीदारांसोबत छेडछाड होऊ शकते. एनसीबीने परदेशात लिंक लागल्याने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला असल्याचे म्हटले आहे. तसेच यामध्ये कोणत्यातरी मोठ्या कटकारस्थानाचा संशय देखील व्यक्त केला आहे.
आर्यन कैदी नंबर N956 (aryan khan qaidi number n956)आर्यन खानचा क्वारंटाईन संपला आहे. यामुळे त्याला आता अन्य कैद्यांसोबत रहावे लागणार आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन खान एनसीबी कोठडी आणि नंतर ऑर्थर रोड तुरुंगात आहे. आज आर्यन खानला कैदी नंबर देण्यात आला आहे. त्याचा आरोपी नंबर N956 आहे. आर्यन खान हा या प्रकरणातील आरोपींसोबतच ऑर्थर रोड तुरुंगात राहणार आहे. परंतू सुरक्षेच्या कारणास्तव त्याची बराकी कोणती ते सांगण्यात आलेले नाही.
संबंधीत बातम्या...
Aryan Khan Drugs Case: वकील 'भांडत राहिले' अन् आर्यन खानला वेळ कमी पडला; धुरंदर सुट्ट्या कसे विसरले
आर्यन खान एवढ्या वर्षांचा असल्यापासून ड्रग्ज घेतोय; NCB ने पुरावे दिलेआर्यन खानच्या जामिनावर २० ऑक्टोबरला फैसला, कोर्टाने राखून ठेवला निर्णय