ऑनलाइन पेमेंट प्रक्रिया सोपी झाली असली तरी, तिचे धोकेही वारंवार समोर येत असतात आणि लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरतात. असाच काहीसा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. येथे एका डॉक्टरने 25 समोसे ऑनलाइन ऑर्डर केले होते. मात्र, डॉक्टरकडून एक अशी चूक झाली की, समोस्यांच्या पैशांसोबतच त्यांच्या खात्यातून तब्बल 1.40 लाख रुपये उडाले. जेव्हा या डॉक्टरला बँकेतून मेसेज आले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील आहे. येथील एका 27 वर्षीय डॉक्टरने आपल्यासाठी आणि सहकाऱ्यांसाठी एक रेस्टोरन्टमधून 25 समोसे ऑनलाइन ऑर्डर केले होते. ऑर्डर केल्यानंतर, त्यांच्या खात्यातून समोस्यांचे बील म्हणून 1500 रुपये कापले गेले. त्यांच्या खात्यातून पैसे कटताच सायबर ठग सक्रिय झाले. संबंधित डॉक्टरला लगेचच एक कॉल आला आणि सांगण्यात आले की, आम्हाला अद्याप पेमेंट मिळाले नाही.
...अन् सुरू झाले बँकेचे मेसेज -समोरून सांगण्यात आले की, दुसऱ्या क्रमांकावर आमची पेमेंट रिक्वेट एक्सेप्ट करा. एक लिंक पाठवण्यात येत आहे. डॉक्टरनेही ओके म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा पैसे पाठवण्याची तयारी दाखवली. येथेच डॉक्टर चुकला. यानंतर, डॉक्टरने त्या लिंकवर पेमेंट केले तर त्याच्या अकाउंटवरून आधी 28 हजार रुपये कटले आणि नंतर, दना-दन मैसेज यायला सुरुवात झाली. यानंत थोड्याच वेळात, आपल्या अकाउंटवरून दीड लाख रुपये उडाल्याचे डॉक्टरच्या निदर्शनास आले.
संबंधित डॉक्टरने आपले बैंक अकाउंट ब्लॉक करेपर्यंत त्यांच्या खात्यातून 1.40 लाख रुपये उडाले होते. यानंतर डॉक्टरने तत्काल मुंबईपोलिसांत सायबर गुन्ह्या प्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना गेल्या शनिवारी घडली.