शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
6
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
8
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
9
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
10
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
11
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
12
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
13
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
14
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
15
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
16
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
17
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
18
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
19
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
20
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दणका; एनडीपीएस कोर्टाने जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 2:59 PM

Aryan Khan's Bail Rejected : आर्यन खानला कोर्टाने दणका देत जामीन फेटाळून लावला आहे.  

ठळक मुद्देआज आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी एनडीपीएस कोर्टात आज पार पडली.एनडीपीएस कोर्टाने आज जामीन फेटाळल्यानंतर आर्यनचे वकील मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. 

Aryan Khan Drug Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahruk Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) २ ऑक्टोबरला एनसीबीकडून अटक करण्यात आलेली असून तो सध्या मुंबईतील आर्थर रोड (Arthur Road Jail) तुरुंगात आहे. कोर्टानं आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आज आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी एनडीपीएस कोर्टात आज पार पडली. मात्र, आर्यन खानला कोर्टाने दणका देत जामीन फेटाळून लावला आहे.  

एनसीबीची (Narcotics Control Bureau-NCB) कोठडी संपल्यानंतर आर्यन खानला इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तुरुंग प्रशासनानं आर्यन खानची सुरक्षा आता वाढवली आहे. आर्यनला स्वतंत्र आणि स्पेशल बॅरेकमध्ये हलविण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वैयक्तिक पातळीवर आर्यन खानवर लक्ष ठेवलं जात आहे. आर्यन खान आणि एका अभिनेत्रीमध्ये चॅटिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान,  एनसीबीच्या पथकाने आरोपींचे जे चॅट कोर्टासमोर ठेवले आहेत. त्यामध्ये आर्यन खान आणि या अभिनेत्रीमध्ये झालेल्या चॅटचाही समावेश आहे. याशिवाय आर्यन खानचे काही ड्रग्स पेडलरसोबतचे चॅटही कोर्टात सोपवण्यात आले आहेत.

एनसीबीने आर्यन खानला जामीन देण्यात येऊ नये यासाठी एनसीबीने आपले म्हणणे मांडले होते. कोर्टामध्ये त्यावरून दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. आर्यन खानचे इंटरनॅशनल ड्रग्स पेडलर्ससोबत संबंध असल्याचा दावा एनसीबीने कोर्टात केला. तसेच हा मोठा कट असून, ज्याचा तपास होण्याची आवश्यकता आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.

उद्या आर्यनची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्या आर्यनचा जेलचा मुक्काम आणखी किती दिवस वाढणार हे कोर्ट ठरवणार आहे. तर एनडीपीएस कोर्टाने आज जामीन फेटाळल्यानंतर आर्यनचे वकील मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. शाहरुखनं आर्यनला पाठवली ४५०० रुपयांची मनी ऑर्डरतुरुंगाचे अधिक्षक नितीन वायचाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान याला ११ ऑक्टोबर रोजी साडेचार हजार रुपयांची मनी ऑर्डर त्याचे वडील शाहरुख खान यांनी पाठवली आहे. या पैशांचा खर्च आर्यन खान याला तुरुंगातील कॅन्टीनमधील जेवणावर करु शकतो. पण तुरुंगात आर्यन पोटभर जेवण करत नसल्याचं सांगण्यात येत आहे. तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार प्रत्येक कैद्याला दरमहा फक्त साडेचार हजार रुपये मनी ऑर्डरच्या स्वरुपात मागविण्याची परवानगी आहे.  

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकCourtन्यायालयDrugsअमली पदार्थ