पुणे: बी.पी. ओ कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय ज्योतिकुमारी हिचा 1 नोव्हेंबर २००७ मध्ये नोकरीच्या शेवटच्या दिवशी गहुंजे येथे आरोपींनी तिच्यावर बलात्कार करून खून केला. त्याप्रकरणी पोलिसांनी कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकाडे यांना अटक केली हाती. सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आरोपींच्या याचिकेवर उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी ही शिक्षा कायम ठेवली होती आरोपींनी २०१५ मध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र तो ही त्यांनी नाकारला. आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी आणि स्वप्ना जोशी यांनी आरोपींची फाशीची शिक्षा रद्दपातल ठरवत जन्मठेपेच्या शिक्षेचा निर्णय दिला. ज्योती कुमारी बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम बोराटे आणि त्याचा साथीदार प्रदीप कोकाडे यांना 24जून रोजी फाशी देण्यात येणार होती.. मात्र शिक्षेला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांचे अपील फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे दोघांनी 2017 मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला होता. ..दया याचिका फेटाळल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणीस कारागृह प्रशासनाने चार वर्षांचा कालावधी लावला..त्यामुळे फाशीचे वॉरंट कधीही येऊ शकते असा विचार करत आरोपी मृत्यूच्या छायेत जगले . ही बाब जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे असल्याचे दोघांनी केलेल्या याचिकेत नमूद केले आहे..सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आरोपींनी राष्ट्रपतींकडे आपल्या शिक्षेचा पुनर्विचार व दयेचा अर्ज केला होता. मात्र तो अर्ज घटनेचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीपतींनी आरोपींचा दया अर्ज नाकारत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपतींच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात ४ वर्ष दिरंगाई केल्यानंतर मुंबई न्यायालयाने सोमवारी आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षेचा निर्णय दिला.
गहुंजे बलात्कार व खून प्रकरणी आरोपींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:16 PM