शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Terrorist arrested in Mumbai: मुंबईतून दहशतवाद्याला अटक! WANTED गुन्हेगाराशी होता संपर्कात; महाराष्ट्र ATSची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 6:56 PM

पंजाब पोलिस-इंटेलिजेंस हेड क्वार्टरवर ९ मे रोजी केला होता रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला

Terrorist arrested in Mumbai: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक विविध ठिकाणी धडक कारवाई करताना दिसत आहे. याच दरम्यान आज मुंबईचा एका ३० वर्षीय दहशतवाद्याल पकडण्यात Maharashtra ATS ला यश आले. अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय दहशतवाद्याचे नाव चरतसिंग उर्फ ​​इंद्रजितसिंग करिसिंग असून तो मूळचा पंजाब येथील आहे. त्याला महाराष्ट्र एटीएसनेमुंबईतून बुधवारी अटक केली. त्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तो कॅनडामधील वाँटेड दहशतवादी (Wanted Terrorist) लखबीर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले, असल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिली.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहिती नुसार, चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग उर्फ कारज सिंग, (वय ३०) असे नाव असलेल्या दहशतवाद्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. मार्च २०२२ पासून तो पंजाबच्या कपूरथला तुरुंगातून २ महिन्यांच्या पॅरोल रजेवर बाहेर होता. त्याच्या पॅरोल कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांसह पंजाब पोलिस, इंटेलिजेंस हेड क्वार्टर, मोहाली येथे ९ मे २०२२ रोजी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) ने हल्ला केला.

त्याच्या ठावठिकाणाबाबत महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकाने त्याला मालाड, मुंबई येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, तो सध्या कॅनडामध्ये असलेल्या लखबीर सिंग लांडा नावाच्या वॉन्टेड दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. पुढील कारवाईसाठी अटक केलेल्या आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसPunjabपंजाबterroristदहशतवादीMumbaiमुंबई