शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

आईची हत्या मुलीच्या प्रेमप्रकरणातून?; तपासात आढळलं उत्तर प्रदेश कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 10:14 AM

महिलेच्या हत्येप्रकरणात रिम्पलला अटक केली असून आता तपासात वेगवेगळे अँगल समोर येत आहेत.

मुंबई - एका मुलीने तिच्या आईचा निर्दयीपणे खून केला असून मुंबईसारख्या शहरात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मुलीने आईच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर काही तुकडे घरातील पाण्याच्या ड्रममध्ये तर काही तुकडे कपाटात लपवले. इतकेच नाही तर आईच्या मृतदेहाच्या तुकड्यांसोबत ही मुलगी जवळपास ३ महिने त्याच घरात राहिली. तरीही कुणाला साधी भनकही लागली नाही. ही भयंकर घटना ऐकून सर्वच हैराण आहेत. 

ड्रमपासून कपाटापर्यंतविविध ठिकाणी मृतदेहाचे तुकडे आढळले. मुंबईच्या रहिवासी भागात घडलेल्या या घटनेने पोलीसही हैराण झाले. मृतदेहाचे तुकडे प्लॅस्टिकच्या बॅगेत बंद होते. मंगळवारी रात्री मुंबईच्या काळाचौकी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने बहिणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. तक्रार करणाऱ्या व्यक्तीने ५५ वर्षीय बहिण वीणा जैन मागील ३ महिन्यापासून तिच्याशी बोलणे होऊ शकले नाही. पेरू कपाऊंडच्या इब्राहिम कासम बिल्डिंगमध्ये २३ वर्षीय मुलीसोबत वीणा राहतात. परंतु ना ती फोनवर भेटते आणि ना बोलणे होते. इतकेच नाही तर जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा मुलगी रिम्पल काही बहाणे बनवून घरातून जायला सांगितले. या घटनेला ३ महिने उलटले असं त्याने तक्रारीत म्हटलं. 

तक्रार करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, माझा मुलगा त्याच्या आत्याला भेटण्यासाठी घरी पोहचला होता तेव्हा दरवेळेप्रमाणे याहीवेळी मुलीने माझ्या मुलाला दरवाजावरूनच घरी पाठवले. आत्या घरी नाही हा प्रकार संशयास्पद वाटतो. तक्रारीनंतर तात्काळ पोलीस महिलेचा शोध घेण्याचा निर्णय घेतात. पोलिसांची एक टीम रात्री वीणा जैन यांच्या शोधात त्यांच्या राहत्या घरी पोहचतात. परंतु दरवाजा उघडताच मुलगी रिंपल पोलिसांना अडवते. आई आराम करतेय असं ती म्हणते. मात्र पोलिसांनी खाकीचा धाक दाखवत घरात प्रवेश केला. तेव्हा आत दुर्गंधी पसरली होती. पोलिसांना संशय आला त्यांनी घरात सर्च केले. तेव्हा त्यांना जे आढळले ते पाहून धक्का बसला. 

हत्या प्रकरणाचे उत्तर प्रदेश कनेक्शनमहिलेच्या हत्येप्रकरणात रिम्पलला अटक केली असून आता तपासात वेगवेगळे अँगल समोर येत आहेत. वीणा जैन हत्या प्रकरणामागे उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आल्याने तपास पथक मुंबईबाहेर रवाना झाले आहे. एका युवकाला ताब्यात घेतले आहे. तेथील तरुणाचा हत्याप्रकरणाशी काय संबंध आहे, याबाबत काळाचौकी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, रिम्पलने वापरलेल्या मार्बल कटरवर रक्ताचे डाग आढळले असून तो तिने घरासमोरच्या दुकानातून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

रिम्पल आईसोबत एकटीच राहण्यास होती. तसेच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्यांत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांचा समावेश अधिक आहे. रिम्पलने हत्या नेमकी कशी केली, यामध्ये शेजारी राहणाऱ्या मुलांचा काही संबंध आहे का, याबाबत काळाचौकी पोलिस तपास करत आहेत. तिच्या चौकशीतून उत्तर प्रदेशात राहणाऱ्या तरुणाची संशयास्पद माहिती पोलिसांच्या हाती लागली. तो तरुण कोण, याचा पोलिस तपास करत आहेत.

प्रेम प्रकरणाच्या दिशेनेही तपास...रिम्पलचे कुणासोबत प्रेमसंबंध होते का, प्रेम प्रकरणाचे यामागे काही कनेक्शन आहे का, अशा सर्व बाजूंनी पोलिस तपास करत आहेत. वारंवार होत असलेल्या वादातून रिम्पलने आईची हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत असली तरी त्या तरुणाच्या चौकशीतून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.