शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

काळजाचा ठोका चुकवणाऱ्या स्टंटबाजास मुंबई पोलिसांनी केली अटक 

By पूनम अपराज | Published: October 16, 2020 2:58 PM

Mumbai Dangerous Stunts Video : दोन्ही हातांवर संपूर्ण शरीराचा तोल टाकून वर पाय करून हा स्टंट केला होता. अगदी थोड्या असमतोलामुळे त्याला जीव गमवावा लागला असता.

ठळक मुद्देपोलिसांनी या तिघांविरूद्ध कलम 336 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.

मुंबई - मुंबईपोलिसांनी शुक्रवारी कांदिवली येथील एका इमारतीच्या 23 व्या मजल्यावरील काठावर धोकादायक 'स्टंट' करणाऱ्या एका तरूणाला आज अटक केली. त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, तो परदेशी स्टंट कलाकारांद्वारे प्रेरित झाला होता. या आठवड्याच्या सुरूवातीस व्हायरल झालेल्या 'स्टंट'च्या व्हिडिओमध्ये हा तरुण मुंबईच्या कांदिवलीतील एका उंच इमारतीच्या 23 व्या मजल्यावरील काठावर काळजाचा ठोका चुकवणार स्टंट करताना दिसला. दोन्ही हातांवर संपूर्ण शरीराचा तोल टाकून वर पाय करून हा स्टंट केला होता. अगदी थोड्या असमतोलामुळे त्याला जीव गमवावा लागला असता.तो तरुण 'स्टंट' करताना दिसत आहे, तर त्याचे दोन साथीदार व्हिडिओ शूट करताना दिसतात, जो स्टंटचा व्हिडीओ नंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. पोलिसांनी या तिघांविरूद्ध कलम 336 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. 

उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट; थरकाप उडवणारा Video तुफान व्हायरल

 

काय आहे हा स्टंट ?सोशल मीडियावर सध्या विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच थरकाप उडवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. उंच इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील लालजी पद येथील जय भारत कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या २३ व्या मजल्यावर हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेतली असून काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट करणाऱ्या तरुणाचा अटक केली आहे. 

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसStuntmanस्टंटमॅनInstagramइन्स्टाग्राम