एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबईपोलिसांच्या साध्या वेशातील पोलिसांकडून हेरगिरी केल्याप्रकरणी वानखेडे यांनी तक्रार मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे सादर केले आहे. या तक्रारीनुसार मी अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलिसाला याप्रकरणी चौकशी करण्यास सांगून अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गेल्या आठवड्यात मुंबईच्या खोल समुद्रात क्रूझवर रेव्ह पार्टी (Cruise Rave Party) करताना पकडण्यात आले होते. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आर्यन खानकडे ड्रग सापडलेले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष्य शाहरुख असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. यावर आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. (mumbai cruise rave party case)
एनसीबीचे मुंबईतील झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आपल्यावर दोन साध्या वेशातील मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांच्याकडे ही तोंडी तक्रार केल्याने खळबळ उडाली. ओशिवारा पोलिसांनी स्मशानात जात असताना समीर वानखेडे यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. वानखेडे यांच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले आहे. तेव्हा पासून ते या ठिकाणी जातात, असे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली.