मुंबई - बिग बॉसमधील स्पर्धक आणि अभिनेत्री पायल रोहतगी सोशल मीडियावर वक्तव्य करुन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काल मुंबईपोलिसांनी आपल्याला ट्विटरवर ब्लॉक केल्याचं पायलने एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. या पोस्टमध्ये तिने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टॅग केलं होतं. तसेच मेल सुद्धा धाडले होते. तिच्या या पोस्टनंतर अमृता फडणवीस यांनी त्या ट्विटला रिप्लाय देत नागरिक आपले वैयक्तिक मतं सोशल मीडियावर मांडू शकतात. मात्र, सार्वजनिक आणि सामाजिक संस्था ब्लॉक करू नये असं म्हटलं आहे. त्यावर अमृता फडणवीस यांच्या ट्विटला रिप्लाय देत मुंबई पोलिसांनी मुंबई पोलीस नेहमीच सर्व नागरिकांसोबत असतात. पायल रोहतगीचे आता ऍक्सेससाठी ओपन आहे. आमच्या पॉलिसीप्रमाणे आम्ही कोणताही मुंबईकराशी चर्चा थांबवू शकत नाही. आमची तांत्रिक टीम तपास करत आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी पायलला अनब्लॉक केल्याची माहिती मिळत आहे. अमृता फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ ट्विटरवर रिप्लाय करत अभिनेत्री पायल रोहतगी हिला अनब्लॉक केले आहे.
अभिनेत्री पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर केले ब्लॉक; अमित शहांना पाठविले पत्र