शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 12:43 PM

Nupur Sharma : रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

 

मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पक्षातून निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता मुंबई पोलीस समन्स पाठवू शकतात. पायधुनी पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे. रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त टिपण्णीवरून बराच गदारोळ झाला आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या आसपास, इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) भारताला घेरत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.दुसरीकडे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करून चालणार नाही, असे म्हटले होते. नुपूर शर्माच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती.

नुपूर यांनी  एक निवेदन जारी करून माफी मागितली आहेमात्र, यानंतर नुपूर शर्मा यांनी ट्विटरवर एक वक्तव्य जारी करत मोहम्मद पैगंबर यांच्यावर टिप्पणी केल्याबद्दल माफी मागितली आहे. नूपुर यांनी लिहिले की, “गेल्या अनेक दिवसांपासून मी टीव्हीवर चर्चेत सामील झाले होते, जिथे माझ्या आराध्य शिव जींचा दररोज अपमान केला जात होता. हे शिवलिंग नसून कारंजे आहे, असे माझ्यासमोर बोलले जात होते. दिल्लीच्या प्रत्येक फूटपाथवर अनेक शिवलिंगे पाहायला मिळतात. जा आणि पूजा करा. आपल्या महादेव शिव जींचा असा वारंवार माझ्यासमोर केलेला अपमान मला सहन झाला नाही आणि मी रागात काही गोष्टी बोललो. माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द परत घेते. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसBJPभाजपाsuspensionनिलंबन