शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

मुंबई पोलीस दलातील पोलिसाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पीडिता राहिली गरोदर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 9:44 PM

Rape Case : पन्हाळा तालुक्यातील घटना, पोक्सोन्वये गुन्हा

ठळक मुद्देराजेंद्र गणपती पाटील (वय २८, रा. करंजफेन, ता. पन्हाळा) असे संशयिताचे नाव आहे. हा पोलीस जुलैमध्ये गावी आला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कारवाईस वेग आला.

कोल्हापूर : दहावीत शिकणाऱ्या पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील गावातील अल्पवयीन (१५ वर्षे ५ महिने) मुलीवर पोलीस सेवेत असलेल्या नात्यातीलच विवाहित तरुणाने सलग दोन वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तरुण मुंबईपोलिसांत आहे. राजेंद्र गणपती पाटील (वय २८, रा. करंजफेन, ता. पन्हाळा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) हा गुन्हा दाखल झाला असून आरोपीस मात्र अटक झालेली नाही.

पीडित मुलीची मासिक पाळी न झाल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेल्यावर ती गरोदर असल्याचे सोमवारी (दि.११) स्पष्ट झाले. त्यानंतर तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण सीपीआरमध्ये नोंद होऊन पन्हाळा पोलिसांकडे चौकशीसाठी गेले. त्यांनी १२ ऑक्टोबरला गुन्हा दाखल तरी केला परंतू त्यांनी चौकशीमध्येच चार दिवस घालवले. वृत्तपत्रांना कुणकुण लागल्यावर गुरुवारी त्याची माहिती देण्यात आली. ही मुलगी दहावीत शिकणारी आहे. सध्या ती दोन महिन्यांची गरोदर आहे. तिच्याकडे अधिक चौकशी केल्यावर संबंधित पोलिसाचे नाव पुढे आले. पोलिसाचे नाव पुढे आल्यावर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करण्यात दिरंगाई केल्याची चर्चा आहे. बुधवारी गावातील काही लोकांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. संबंधित पोलीस गावी कधी आला होता, याची मुख्यत: त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. हा पोलीस जुलैमध्ये गावी आला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर कारवाईस वेग आला.

धमकी...फिर्यादीत असे म्हटले,  ही मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असतानाही त्यांने त्या मुलीस प्रेमाचे आमिष दाखवून जून ते ऑगस्ट २०२१ मध्ये करंजफेन (ता. पन्हाळा) येथील उत्तम केरबा पाटील यांच्या घरात अत्याचार केला. आपल्यात झालेले कुणाला सांगायचे नाही, अशी धमकीही त्यांने दिली.

कलमे अशी...पन्हाळा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर १३०/२०२१ भादंविस कलम ३७६, ५०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४, ५, ६, ८ व १० प्रमाणे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाMumbaiमुंबईkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPregnancyप्रेग्नंसी