मुंबई : बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्ताने मुंबईपोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात बसविण्यात आलेल्या सुमारे ५ हजार सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण शहरावर नजर असणार आहे.
शहराच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दिमतीला केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या तुकड्या जागोजागी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शिघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हील डिफेन्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाहतूक पोलीस जवान रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून तैनात ठेवले आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी अभिलेखावरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासोबतच फेसबूक, व्हॉटसअॅप सारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर करडी नजर ठेवली आहे. याच सोशल नेटवर्कींग साईटवरून भडकाऊ संदेश पसरवले जाऊन अफवांच्या माध्यमातून सामाजिक तंटे निर्माण झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्याने पोलिसांनी आधीच खबरदारीची पावले उचलली आहेत. प्रत्येक विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांमार्फ़त जलतरणपट्टू तसेच तटरक्षक दल आणि नौदलाच्या मदतीने बोटी, लॉन्चेस उपलब्ध करण्यात येणार आहे. सर्वानी नियमांचे पालन करत, विनाकारण विसर्जन स्थळी गर्दी करू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती