प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ कार प्रकरणाचा तपास वेगाने NIA करत आहे. तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएस तपास करत आहे. मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्सच्या बी - ६ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार आणि सोसायटीच्या आतील सर्व सीसीटीव्ही फुटेज २ मार्च रोजी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कोणाला माहिती देवू नका, असे आवाहनही सोसायटीच्या पदधिकाऱ्यांना करण्यात आले.
साकेत कॉम्प्लेक्समधील या घरी वाझे कुटुंबीय जाऊन येवून असतात, अशी माहिती या सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी दिली आहे. वाझे यांची अनेक घरे आहेत. त्यामुळे ते एका ठिकाणी नसतात, अशी माहितीही या सुरक्षांनी माध्यमांना दिली आहे. NIAची टीम देखील तपासासाठी वाझे यांच्या ठाण्यातील घराकडे गेले होते. तसेच NIA ची टीम मनसुख हिरेन यांच्या दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही पाहणीसाठी गेले असता तेथीलही सीसीटीव्ही आधीच कीनीतरी नेल्याचं लक्षात आलं आहे. तसेच ज्या दुकानदाराकडून बोगस नंबर प्लेट्स बनवून घेतल्या त्या दुकानदाराला NIA शोधले असून त्याने देखील सचिन वाझेचे नाव घेतल्याने आणखी एक पुरावा हाती लागला आहे. दुकानदाराची NIA ने चौकशी केली आहे. सचिन वाझे हे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्सचा परिसर हा राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे या सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना वाझे यांना भेटायला कोणालाही गेटच्या आतमध्ये सोडू नका, असे सक्त आदेश राबोडी पोलिसांनी दिले आहेत.