शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

समीर वानखेडे यांना दणका, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 6:05 PM

Sameer Wankhede : याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच नवी मुंबईतील बारचा परवानाही रद्द केला होता.

बहुचर्चित IRS अधिकारी आणि NCB मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. बारचा परवाना घेऊन बनावटगिरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वीही त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच नवी मुंबईतील बारचा परवानाही रद्द केला होता.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, आज हायकोर्टाने २६ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे ठाणे पोलिसांना निर्देश दिले आहेत. 

नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप केले होतेवय लपवून बारचा परवाना घेतल्याप्रकरणी समीर वानखेडेविरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेचा नवी मुंबईत बार असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी समीर वानखेडे यांना अल्पवयीन असताना परवाना मिळाला. नवी मुंबईतील हॉटेल सद्गुरू येथे बारचा परवाना घेतला तेव्हा वानखेडे हे १७ वर्षांचे होते, असा दावा मलिक यांनी केला होता.

समीर वानखेडे यांना तूर्तास दिलासा, २८ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश1997 मध्ये परवाना देण्यात आला27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडे यांना बार आणि रेस्टॉरंटसाठी परवाना देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यावेळी समीर वानखेडे हे अवघे १७ वर्षांचे होते. तर बार परवाना मिळविण्यासाठी किमान वय २१ वर्षे आहे.या वर्षाच्या सुरुवातीला समीर वानखेडे यांच्या बार आणि रेस्टॉरंटचा मद्यविक्रीचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला होता. वाशी, नवी मुंबई परिसरातील सद्गुरु फॅमिली बार आणि रेस्टॉरंट हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाचे आहे. डीएमच्या आदेशानुसार सद्गुरु हॉटेल आणि बारचा परवाना रद्द करण्यात आल्याचे ठाण्याचे एसपी, एक्साईज निलेश सांगडे यांनी परवाना रद्द करताना सांगितले होते. यापूर्वी डीएमने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होतेयापूर्वी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. क्रूझ खटल्यातील एका स्वतंत्र साक्षीदाराने हे आरोप केले आहेत. किरण गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलने दावा केला होता की, शाहरुख खानच्या मुलाला सोडण्यासाठी 25 कोटींच्या डीलची चर्चा होत होती आणि शेवटी 18 कोटींमध्ये डील फायनल झाली, त्यापैकी 8 कोटी समीर वानखेडेला मिळणार होते. यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात एक एक असे खुलासे केले की समीर वानखेडे अडचणीत आले. आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतूनही वानखेडे यांना बाजूला करण्यात आले होते. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे समीरला एनसीबीमध्ये नोकरी मिळाल्याचे नवाब यांनी म्हटले होते. नवाब मलिक यांनी समीरने दोनदा लग्न केल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता.

 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेHigh Courtउच्च न्यायालयthaneठाणेPoliceपोलिसNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबई