मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइमब्रांचला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या अटकेनंतर साधारणपणे 10 तासांनी क्राइम ब्रांचने नेरुळ भागातून रयान थारप नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत राज कुंद्रासह 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Pornography case crime branch arrested ryan tharp arrested yesterday)
राज कुंद्राविरोधात फेब्रुवारी 2021 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर काल लात्री क्राइम ब्रांच पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली. राजवर अश्लील फिल्म्स तयार करण्याचा आणि त्या काही अॅप्सवर दाखविण्याचा आरोप आहे. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलमध्ये दीर्घ चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड -मुंबई क्राइम ब्रांचने म्हटले आहे, की राज कुंद्रा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. राज कुंद्रा आणि ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाने केनरिन नावाची एक कंपनी बनवली आहे. यावर पोर्न फिल्म्स बघितल्या जातात. या फिल्म्सचे व्हिडिओज भारतात शूट केले जात होते आणि ते WeTransfer च्या माध्यमाने परदेशात पाठविले जात होते.
मुंबई क्राइम ब्रांचची टीम राज कुंद्राला मंगळवारी कोर्टात हजर करणार आहे. पोलिसांनी म्हटले आहे, की त्यांच्याजवळ राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे आहेत. पोलिसांनी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथलाही अटक केली आहे.
Poonam Pandey ने Raj Kundra वर लावले होते गंभीर आरोप, म्हणाली - माझ्या फोटो-व्हिडीओसोबत...
अभिनेत्री सागरिका सोना सुमनचा आरोप -राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने आपल्यालाही याबाबत वाईट अनुभव आल्याचो सांगितले आहे. हे अश्लील चित्रपटांचे एक मोठे रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता, असा दावा सागरिका सोना सुमन हिने केला आहे.