मुंबई - मुसाफिरखान येथे धाड घालत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) १ कोटी ७ लाख रुपयांची रोकड आणि २ कोटी ३१ लाख रुपयांच्या इंपोर्टेड सिगारेट जप्त केल्या आहेत. संपूर्ण मुंबई शहरात इंपोर्टेड सिगारेट पुरविणारा वितरकाचे पाच ते सहा गोडाऊनवर डीआरआयने धाडी घालत मोठी कारवाई केली आहे. तसेच वितरक असलेल्या दोघांना डीआरआयने अटक केली आहे.
७५ एमएम आणि त्यापेक्षा अधिक लांबीच्या ७ लाख ३२ हजार ६४० सिगारेट डीआरआयने जप्त केल्या आहेत. या जप्त केलेल्या परदेशी बनावटीच्या इंपोर्टेड सिगारेटची किंमत २ कोटी ३१ लाख इतकी आहे. तर गोडाऊनमध्ये डीआरआयच्या अधिकाऱ्यांना भारतीय चलनातील १ कोटी ७ लाख रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. दिल्लीतील एक इसम देखील इंपोर्टेड सिगारेट तस्करी करण्यात सामील आहे. मोर्लबोरो, मोर, बेन्सन हजेस, रॉथमन्स, गुडन गरम अशा इंपोर्टेड सिगारेट या धाडीत जप्त करण्यात आल्या आहेत.