मुंबई- रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) पथकाने मोठी कारवाई केली आहे. नवी दिल्ली - एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून तब्बल २ कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ आरपीएफने जप्त केले आहे. अटक आरोपीचे नाव सनी ओका आयके (वय ४१) असे त्याचे नाव असून, तो नायजेरियाचा नागरिक आहे. मध्य रेल्वेने बुधवारी ही माहिती दिली.नवी दिल्लीहून एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून येणाऱ्या नायजेरियन आरोपीकडे असलेल्या बॅगमध्ये नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट अन्वये (एनडीपीएस) बंदी असलेले एमफेटामाइन हे अमली पदार्थ पोलिसांना सापडले. त्याची किंमत अंदाजे २ कोटी रुपये आहे. रेल्वे पोलिसांनी या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. निळजे आणि तळोजादरम्यान अलार्म साखळी ओढून एक्स्प्रेस थांबवून नायजेरियन आरोपीला अटक करण्यात आली. रेल्वे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल के. एन. शेलार आणि शिवाजी पवार यांनी नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. तो नवी दिल्ली-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करत होता. नवी मुंबईतील निलजे आणि तळोजा या रेल्वे स्थानकांदरम्यान तो उतरला होता. त्याचवेळी सतर्क असलेले शेलार आणि शिवाजी पवार यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला ठाणे (दिवा) रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याची चौकशी केली.पासपोर्ट क्रमांक, नवी दिल्ली ते पनवेल, तृतीय वातानुकूलित डब्ब्यातून प्रवास केल्याचे सांगितले. पीएनआर क्रमांक सांगितला. नायजेरियन व्यक्तीच्या बॅगची तपासणी केली असता, संशयास्पद पदार्थ आढळून आला. पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, मध्य रेल्वे, मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी), मुंबई यांच्याशी संपर्क केला. त्यांची मदत घेतली गेली. तपास पथक, तज्ज्ञांसह आरपीएफ ठाणे दिवा येथे आले. पदार्थाची तपासणी केली असता २.३ किलो वजनाचे 'अॅम्फॅटामाइन्स’ नावाचे एक अंमली पदार्थ असल्याचे आढळून आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत अंदाजे २ कोटी आहे. नार्कोटिक्स ड्रग्स अंड सायकोट्रोपिक सबस्टन्ससेस ( एनडीपीएस ) कायद्यांतर्गत प्रक्रिया सुरु आहे. आरोपी आणि जप्त केलेला अमली पदार्थ एनसीबी अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य
किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ
राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात