(Image Credit : Tv9)
कोरोना काळात एकीकडे काही लोक मानवता धर्म निभावत अनेकांना मदत करत आहेत. तर काही लोक आपला फायदा बघत आहेत. एका मालकाचं असंच निर्दयी रूप समोर आलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीला पतीला मालकाने जाऊ दिलं नाही. या रागात पतीने मालकाला चांगलाच मोठा दणका दिलाय. आपला नोकर असं काही करेल याचा मालकाला अंदाजही नसेल.
tv9marathi.com ने दिलेल्या एका वृत्तानुसार, ही घटना कांदिवलीमध्ये घडली. इथे एका नोकराने मालकाच्या घरातून तब्बल ७ लाख ५० हजारांचे सोन्याने दागिने आणि ४० हजाराची रोकड लांबवली. घरमालकाने तक्रार केल्यानंतर आरोपी अनिल यादव आमि श्याम यादव याला पोलिसांनी थेट बिहारमधील दरभंगा येथून ताब्यात घेतले आहे.
काय होतं कारण?
रिपोर्टनुसार कांदिवलीच्या विश्व मिलन सोसायटीमध्ये नवीनचंद्र मिस्त्री नावाचे ज्येष्ठ नागरिक राहतात. ते गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्यांच्या अंधेरी इथे राहणाऱ्या मुलीने वडिलांची काळजी घेण्यासाठी श्याम सुंदर यादव नावाच्या व्यक्तीला कामावर ठेवले होते. (हे पण वाचा : पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाच अपहरण; तिघांना अटक )
काही दिवसांनी श्याम सुंदर भावाच्या गावी गेला. त्यामुळे त्याने मालकांची काळजी घेण्यासाठी मित्र अनिल यादव याला कामावर ठेवले. या काळात अनिल यादवने मिस्त्री यांची पुरेपूर काळजी घेतली. मात्र, १३ दिवसानंतर गावाला राहणाऱ्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झाल्याचं अनिल यादवला समजलं.
पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याचा धक्का बसला आणि तिला शेवटचे पाहण्यासाठी गावाकडे जाण्यासाठी त्याने मालकाकडे परवानगी मागितली. मात्र, मिस्त्री यांनी त्याला घरी जाण्यास नकार दिला. शेवटी गावाकडे जाऊ न दिल्यामुळे यादवला आपल्या पत्नीला शेवटचे पाहता आले नाही. याचा राग त्याच्या मनात होता. (हे पण वाचा : बनावट चावीने कपाट उघडून ६० लाख लंपास करणाऱ्या ‘कुक’ला बेड्या; पिंपरी पोलिसांची कामगिरी)
शेवटी याच रागातून अनिलने २८ एप्रिल रोजी स्वत:च्याच मालकाच्या घरी चोरी केली. बरेच दागिने आणि रोकड घेऊन तो फरार झाला. १ मे रोजी मिस्त्री यांनी मुलगी घरी आली. यावेळी घरातील सोने तसेच चांदीचे दागीने गायब असल्याचे समजले. घरात ठेवलले तब्बल ७ लाख ५० हजाराचे सोने-चांदीचे दागिने आणि ४० हजारांची रोख अनिल यादवने लांबवली होती.
हा प्रकार घडल्यानंतर दर्शनी यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आपले सूत्र आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला. यामध्ये अनिल यादवने चोरी केल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून अनिल यादव आणि श्याम सुंदर या दोघांनाही अटक केली.