मुंबई - कोरोना संकटातून नागरिकांना वाचविण्यासाठी मुंबई पोलीस प्राणपणाने प्रयत्न करीत असताना एका महिला पोलीस हवालदाराने आपले दातृवाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. नायगाव येथील कंपनी -2 च्या कारकुन म्हणून काम पाहत असलेल्या पोलीस नाईक रेहाना नसीर शेख यांनी रायगड जिल्ह्यातील (धामणी, पो. वाजे, ता. पनवेल) ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील 50 विद्यार्थाना दत्तक घेतले आहे. त्याच्या शिक्षणासाठी वर्षभर येणारा खर्च त्या करणार आहेत.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या रेहाना शेख यांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यानिमित्याने त्यांनी परिचयातील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाद्यपदार्थ पाठवले होते. त्यावेळी मुलींनी त्यांचे धन्यवाद देणारा व्हिडीओ बनवून पाठविला. त्यामध्ये शाळेतील अडचणी सांगितल्या होत्या. त्यानंतर शेख यांनी यावर्षी शाळा सुरु झाल्यास मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचावासाठी हॅण्ड ग्लोज, सॅनिटायझर, मास्कदेखील पाठवले. त्याचप्रमाणे 50 विद्यार्थचा खर्च उचलन्याची तयारी दर्शविली. त्याबाबत शाळेला लेखी पत्र देऊन कळविले. दरम्यान, याबाबत ज्ञानाई माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आनंदी दिवकर कोळी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष महादेवबुवा शहाबाजकर म्हणाले,' देशाचे उज्ज्वल नागरिक घडवण्याचा दृष्टीने पोना रेहाना शेख यांनी घेतलेल्या निर्णय कोतुकास्पद आहे. त्यामुळे गरीब होतकरू मुलांना मदत होणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण
सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहादसाठी भडकवत होता लोकांना, युपी एटीएसने केली अटक
बेपत्ता ७० वर्षाच्या वृध्दाचा मृतदेह आढळला, लोखंडी तारेने गळा आवळून हत्या
प्रेयसीला सोबत घेऊन कॅशियरनेच लावला बँकेला चूना; 'इतकं' किलो सोनं लंपास