Mumbai Crime News : २३ वर्षाच्या एका तरूणाला जिगेलो (Gigolo) बनण्याची इच्छा चांगलीच महागात पडली आहे. जिगेलोचं काम मिळवून देण्याच्या नादात त्याची १.५३ लाख रूपयांनी फसवणूक (Fraud) करण्यात आली. जेव्हा जिगोलो बनण्याचं स्वप्न मातीत मिळालं तेव्हा त्याने पोलिसांकडे तक्रार केली. मुंबईतील माटुंगा पोलिसांनी शुक्रवारी तरूणाची फसवणूक करणाऱ्या ३० वर्षीय रोहित कुमार गोवर्धनला अटक केली. मुंबई पोलिसांनी रोहित कुमारला दिल्लीतून अटक केली. त्याने तरूणाकडून जिगोलोचं काम देण्यासाठी १.५३ लाख रूपये घेतले होते. याप्रकरणी एका महिलेचा शोध सुरू आहे.
कशी झाली फसवणूक?
तक्रारदार तरूण पोलिसाच मुलगा आहे. त्याने इंटरनेटवर कॉल बॉयची एक जाहिरात पाहिली होती. जाहिरातीतील एका नंबरवर त्याने फोन केला. कॉल उचलणाऱ्या व्यक्तीने त्याला सांगितलं की, तो जिगोलो कंपनी चालवतो आणि या काम करणाऱ्या कॉल बॉयला ट्रेनिंग देतो. त्यानंतर कंपनीच्या फीमेल क्लाएंट्सचं मनोरंजन करायचं असतं. फोन उचलणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, क्लाइंटकडून जेवढी रक्कम मिळेल त्यातील २० टक्के कंपनीचा असेल. बाकी ८० टक्के रक्कम कॉल बॉयच्या खात्यात जाईल. (हे पण वाचा : 'त्या'सॉफ्टवेअरची कहाणी ज्यामुळे नरेंद्र मोदींवर आजवरचा सर्वात मोठा आरोप झाला!)
पोलिसांनी सांगितलं की, इतकं सगळं झाल्यानंतर कंपनीकडून तक्रारदार तरूणाला कथितपणे एक दिवस एका फीमेल क्लाइंटचा नंबर दिला. तरूणाने त्या महिलेला फोन केला. कथितपणे महिला ग्राहक तरूणाला म्हणाली की, मीटिंगसाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची आहे. त्यासोबतच तिथे पोहोचण्यासाठी टॅक्सी, ड्रायव्हर आणि इतर वस्तूंची गरज लागेल. या सर्व कामांसाठी तुला माझ्या अकाऊंटमध्ये ३२ हजार रूपये पाठवावे लागतील. मीटिंग झाल्यावर फीसोबत हे पैसे परत देणार. तरूणानेही तेवढे पैसे महिलेच्या अकाऊंटमध्ये जमा केले.
दोन वेळा महिलेच्या खात्यात टाकले पैसे
यानंतर तरूण महिलेला फोन करत राहिला, पण तिने फोन उचलला नाही. मग तरूणाने कंपनीतील व्यक्तीला फोन केला. त्याने सांगितलं की, डील कॅन्सल झाली आहे. तुला दुसऱ्या क्लाइंटचा नंबर दिला जाईल. वाट बघ. नंतर त्याला पुन्हा एका दुसऱ्या महिलेचा नंबर देण्यात आला. पुन्हा तेच झालं. पण यावेळी तरूणाकडून १.२१ लाख रूपये लुटण्यात आले.
तरूणाने त्याच्या वडिलांकडून हे पैसे घेतले होते. जेव्हा काही दिवस काहीच उत्तर आलं नाही तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, त्याची फसवणूक झाली आहे. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार दिली. २२ डिसेंबर २०२१ ला याप्रकरणी एफआयआर दाखल झाली. बॅंक डिटेल्सची चौकशी केली गेली आणि आरोपीला दिल्लीहून अटक केली. पोलीस महिलेबाबत माहिती मिळवत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, महिला विवाहित आहे आणि गोवर्धनसोबत तिने काम केलं.