वडगाव मावळ : लग्न झालेल्या महिलेचे पुन्हा लग्न लावून नवरदेवाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये नऊ महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. याबाबत गणेश अर्जुन सावळे (वय ३२, व्यवसाय मुंबईचे डबेवाले, रा. सध्या दिवड, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. मुलूंड काॅलनी, हनुमान पाडा) याने फिर्याद दिली.
Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक
याप्रकरणी मोना नितीन साळुके (वय २८, रा. मांजरी, पुणे), दिगंबर जगन्नाथ भांबरे (वय २९, रा. मांजरी बुद्रुक), सोनाली ऊर्फ विद्या सतीश खंडाळे ( वय २७ , रा. पद्मावती, कात्रज, धनकवडी), ज्योती रवीेंद्र पाटील वय ३५, रा. केसनंद फाटा, वाघोली), सतीश रंगनाथ झांबरे (वय २९ रा, धायरी ), महानंदा ताणाजी कासले (वय ३९ रा. हडपसर), रूपाली सुभाष बनपटटे (वय ३७), कलावती सुभाष बनपट्टे (वय २५), सारिका संजय गिरी वय ३३, सर्व रा. वडारगल्ली, पुणे), स्वाती धर्मा साबळे (वय २४, रा. भेकराईनगर, हडपसर), पायल गणेश साबळे (वय २८, रा. गडद, ता. खेड), माणिक लोटे व त्याचा एक सहकारी नाव पत्ता माहीत नाही, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गोळीबारात गोल्डमॅन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला, दुचाकीवरून अज्ञात मारेकरी फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साबळे हा मुंबईत डबे पोहचवण्याचे काम करतो. लग्न जमवून देणारा एक जण आहे असे त्याच्या मित्राने सांगितले. त्यानंतर त्याने माणिक लवटे याच्याबरोबर संपर्क केला .खेड तालुक्यातील गडद गावी बोलवले. मुलगी दाखवली. दोन दिवसांनंतर घर पाहण्यासाठी दिवड गावी आला. मुलगी पसंत पडल्यावर मध्यस्थांनी अडीच लाखांची मागणी केली. नवरदेवाने देण्याचे कबूल केले. लग्नाची तारीख २१ जानेवारी ठरली. सोनाली ऊर्फ विद्या सतीश खंडागळे (वय २७ रा. कात्रज, पुणे) हिचे आळंदी येथे लग्न झाले. आठ दिवसांने कळाले तिला दोन मुली आहेत. शंका आल्याने नवऱ्याने मोबाईल चेक केला. त्यामध्ये तिचे संभाषण ऐकले की माझे ठरलेले पैसे द्या, मी पैसे व सोने घेऊन पळून येते. यानंतर ताजे गावचे माजी उपसरंपच नीलेश केदारी, सदस्य उमेश केदारी, महादू मालेकर, अनंता मालेकर, रोहिदास आमले यांनी मुलीला न कळता गुन्हे अन्वेषण पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फोजदार दतात्रय जगताप, उपनिरीक्षक शीला खोत, सुनीता मोरे, नंदा कदम यांनी सापळा रचून या अकरा जणांना अटक केली. पुढील तपास वडगाव पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शीला खोत करीत आहेत.