उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका प्रियकराला तरुणीच्याच कुटुंबीयांनी चोर समजून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. यानंतर, मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या या प्रियकराला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथून त्याला चांगल्या उपचारासाठी उच्च केंद्रात पाठविण्यात आले. हे प्रकरण बिसांडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील आहे.
यासंदर्भात माहिती देताना जखमी प्रियकराने सांगितले, की तो डीजे वाजविण्याचे काम करतो. तो रात्रीच्या वेळी डीजे वाजवून घरी जात होता. याचदरम्यान, त्याच्या प्रेयसीने त्याला घड्याळ देण्यासाठी फोन करून बोलावले. ती म्हणाली की, आई-बाबा घरी नाहीत. तू ये आणि गिफ्टचे घड्याळ घेऊन जा. यानंतर, तो तिच्या घरी पोहोचला आणि दरवाजा उघडून आत जाऊ लागला.
कुटुंबीयांनी चोर संमजून केली मारहाण -यादरम्यान मुलीच्या वडिलांनी आणि भावांने त्याला पाहिले आणि चोर समजून बेदम मारहाण केली. या संपूर्ण प्रकाराचा गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोकही जमा झाले. अखेर या लोकांना कसे बसे प्रकरण शांत केले. यानंतर, संबंधित प्रियकर तरुणाने संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर लोकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, आता संबंधित तरुणाची प्रकृती स्थीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो लवकरच बरा होईल, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.
यासंदर्भात माहिती देताना बिसंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंद कुमार यांनी सांगितले की, "एक तरुण डीजे वाजविण्यासाठी गेला होता. तो डीजे वाजवून घरी जात असताना, एका तरुणीच्या घरी गेला. यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. यानंतर पुढील कारवाई केली जाईल."