औरंगाबाद: अतिक्रमण पाडण्याची धमकी घेत एक लाख रुपये लाच घेताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा शाखा अभियंता वामन राघोबा कांबळे आणि खाजगी व्यक्ती विजय हरिश्चंद्र निकाळजे यांना एसीबीने रविवारी सायंकाळी सापळा रचून रंगेहाथ पकडले .महानगर पालिकेच्यावतीने भावसिंगपुरा भागात डी पी रोडवरील अतिक्रमण पाडण्याचे काम चार दिवसापासून हाती घेण्यात आले आहे .वामन कांबळे हे या पथकाचे प्रमुख आहे . मनपाने तक्रारदार यांच्या घराच्या पायऱ्या आणि भिंतीवर लाल खुणा केल्या होत्या. महापालिका सोमवारी तुमच्या घराचे अतिक्रमण पाडणार अशी धमकी आरोपीनी दिली . महापालिकेची कारवाई टाळायची असेल तर अडीच लाख रुपये लाच आरोपी वामन कांबळे यांनी मागितली . यावेळी खाजगी व्यक्ती निकाळजेने मध्यस्थी केली तेंव्हा आरोपी कांबळे ने लाचेचा पहिला हाप्ता म्हणून एक लाख रुपये घेण्याची तयारी दर्शविली तक्रारदार यांची लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबी च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दोन्ही आरोपी कांबळेला एक लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले . पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक ब्रम्हदेव गावडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली .
एक लाख रुपयांची लाच घेताना पालिका अभियंत्यासह दोघे रंगेहात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 9:32 PM