रांची:झारखंड राज्यातील गुमला येथे अंधश्रद्धेमुळे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील लुटो गावात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना जादूटोणा केल्याच्या संशयावरुन गळा चिरून ठार मारण्यात आलं. हत्येनंतर आरोपींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
ओडिसा आणि आंध्र प्रदेशात धडकणार 'गुलाब' चक्रीवादळ, मुसळधार पावसासह भूस्खलनाचा अलर्ट
जुन्या वादातून नातेवाईकांनीच काढला काटा
घटना 25 सप्टेंबर रोजी घडली. गुमलाच्या लुटो गावात 55 वर्षीय बंधन उरांव, पत्नी सोमारी देवी आणि 40 वर्षीय सूनेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बंधन उरांव आणि त्यांची पत्नी सोमरी देवी सफाई कामगार म्हणून काम करायचे. दरम्यान, या कुटुंबाचे त्यांचा पुतण्या बिपट उरांव आणि जुलू उरांवसोबत जुना वाद होता. या वादामुळे दोघांनी मिळून या तिघांची हत्या केली. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी पोलिसांना आत्मसमर्पण केले. पोलिसांनी हत्येत वापरलेलं शस्त्रही जप्त केलं आहे.
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला, अनेक सैनिक ठार
फेब्रुवारीमध्ये 5 जणांचा बळी गेलागुमल्यामध्ये अनेकदा जादूटोण्यामुळे हत्या झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी कामदरा पोलीस स्टेशनच्या बुरुहाटू गावात निकोडिन टोपनोच्या कुटुंबातील 5 जणांची जादूटोण्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली होती. गुमला पोलिसांनी त्या प्रकरणात गावातील 8 आरोपींना अटक केली होती.