उत्तरप्रदेशातील बरेलीमधून एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका प्रेमी युगुलाची मारून मारून हत्या करण्यात आली आहे. अशी चर्चा आहे की, ही ऑनर किलिंगची घटना आहे. ही घटना मीरगंज पोलीस स्टेशन परिसरातील अम्बरपूर गावात घडली. हल्लेखोरांनी प्रेयसी आणि प्रियकराला प्रेम करण्याची अशी शिक्षा दिली की, लोकांच्या मनात भिती बसेल. त्यांनी आधी दोघांना मरेपर्यंत मारहाण केली आणि नंतर दोघांचे मृतदेह झाडावर लटकवले. या घटनेची सूचना मिळाल्यावर एसएसपी घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
बीए शिकणारा विद्यार्थी दिव्यानंद वडिलांच्या मृत्यूनंतर शेतात मोलमजुरी करून आपल्या परिवाराचं पोट भरत होता. असे सांगितले जात आहे की, दुपारच्या वेळी दिव्यानंद त्याच्या गव्हाच्या शेतात पाणी देत होता. अशात दिव्यानंदच्या शेजारी राहणारी त्याची प्रेयसीही शेतात त्याला भेटायला आली. (हे पण वाचा : प्रेम प्रकरणातून मित्राचाच केला खून; २४ तासांमध्ये आरोपीला अटक करण्यात यश)
दोघेही शेताच्या धुऱ्यावर बसून बोलत होते. अचानक मुलीच्या परिवारातील लोकांनी दोघांना एकत्र पाहिललं. ज्यानंतर त्या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी दोघांचेही मृतदेह झाडावर लटकवण्यात आले. (हे पण वाचा : दृश्यम स्टाइल मर्डर! प्रियकराने विवाहित प्रेयसीला तीन फूट खड्ड्यात गाडलं, वरून सीमेंट टाकलं आणि....)
पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने पहिल्या नजरेतच आरोपींचा खेळ पकडला. गावात चर्चा आहे की, दिव्यानंद आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने जी ११ व्या वर्गात शिकत होती. दोघांचं प्रेम प्रकरण होतं. दोघेही नेहमीच जंगलात एकमेकांना भेटत होते. गुरूवारी दोघांनाही मुलीच्या परिवारातील लोकांनी एकत्र पाहिलं होतं आणि दोघांची हत्या केली.
सध्या पोलिसांनी याप्रकरणी दोन लोकांना ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत. त्यासोबतच तरूणाच्या कुटुंबियाने मुलीचे वडील तेजराम आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा आरोप लावला असून तशी तक्रार दिली आहे. तर मृत तरूणाच्या पुतण्याने ही घटना होताना डोळ्याने पाहिलंय.
याबाबत एसएसपी रोहित सिंह म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने पुरावे जमा केले. प्राथमिक पाहणीत ही हत्येची घटना वाटते. घटनेनंतर २ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. लवकरच आरोपींना अटक करून प्रकरणाचा खुलासा केला जाईल.