लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या पक्षात प्रभाव निर्माण करण्याच्या स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादानंतर दोघांनी चाकू तसेच बॅटचे फटके मारून एकाची हत्या केली. राज विजयराज डोरले ( वय २८) असे मृताचे नाव असून तो भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर उपाध्यक्ष होता. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी मुकेश नारनवरे आणि अंकित चतुरकर या दोघांना अटक केली आहे.कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज डोरले याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून आरोपी मुकेश नीळकंठ नारनवरे आणि अंकित विजयराज चतुरकर या दोघाचा वाद सुरू होता. हे तिघेही एकाच पक्षात कार्यरत होते. आपल्या पक्षात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नरत होते. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. काही दिवसापूर्वी राज याचा मित्र सारंग याच्यासोबत आरोपीचा वाद झाला होता. त्यावेळी राज याने सारंगची बाजू घेऊन आरोपींना फटकारले. त्यामुळे वाद आणखीच वाढला होता. पाच दिवसापूर्वी याच कारणांवरून आरोपींसोबत राजचा कडाक्याचा वाद झाला होता. त्यावेळी अन्य मित्र धावून आल्याने संभाव्य अनर्थ टळला. तेव्हापासून आरोपी मुकेश आणि अंकित राज याचा गेम करण्याच्या तयारीत होते.या घटनेमुळे कोतवाली परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. कोरोनाच्या काळात भोजनदान आणि अन्य मदतीसाठीही त्याचा सक्रिय पुढाकार होता.
भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 5:25 AM