जळगाव : तालुक्यातील भोकर येथील ११ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करुन त्याचा खून करणाऱ्या यश उर्फ गोलू चंद्रकांत पाटील (वय २१,रा.डांभूर्णी, ता.यावल) याला न्यायालयाने मरेपर्यंत कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी सोमवारी हा निकाल दिला. गुन्हा घडल्यापासून आरोपी कारागृहातच आहे. यश याच्यावर अशाचे प्रकारचे तीन गुन्हे दाखल असून एका खटल्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.
जळगाव तालुक्यातील भोकर येथे ११ वर्षीय बालकाचा १६ मार्च २०२० रोजी एका शेतात कुजलेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात यश याला अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी तपास करुन १० जून २०२० रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी १२ साक्षीदार तपासले.
क्राइम :संजय दत्तला AK-56 देणारा समीर हिंगोरा अन् माहीम दर्ग्याचे ट्रस्टी रडारवर
डिएनए ठरला महत्वाचा पुरावाया घटनेत मृताचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, शिवाय डोळाही काढला होता. त्यामुळे मुलाची ओळख पटविण्यासाठी मुलगा व त्याचे वडील या दोघांचे डिएनएसाठी नमुने घेऊन ते न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठिवले असता ते जुळून आले. त्यानंतर आरोपी यश याचे डिएनएसाठी नमुने घेण्यात आले होते. त्यात अनैसर्गिक कृत्य केल्याचे उघड झाले.