मुंबई - बेरोजगारीमुळे वडिलांकडून सुरू असलेले सततचे टोमणे त्यात, घरखर्चासाठी पैशांच्या अट्टाहासाला कंटाळून ३३ वर्षीय मुलाने वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना जे जे मार्ग परिसरात घडली. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी शाहनवाज अखिल अन्सारी (३३) याला बुधवारी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायखळा रेल्वे कॉलनी येथील संजय गांधी नगर परिसरात अन्सारी कुटुंबीयांसोबत राहायचे. मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास अन्सारी यांचा शाहनवाजसोबत पैशांवरून वाद झाला. याच रागात शाहनवाजने स्वयंपाकघरातील चाकूने वडील अखिल अन्सारी (५६) यांच्यावर वार करून पळ काढला. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.घटनेची वर्दी लागताच जे जे मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी, या प्रकरणी मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांचा शोध सुरू केला आहे. बुधवारी शाहनवाजला अटक करण्यात आली आहे. शाहनवाजने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याचे वडील त्याला ऊठबस टोमणे मारत होते आणि सतत घरखर्चासाठी पैशांची मागणी करीत होते.
पैसे मागितल्याच्या रागात वडिलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:00 PM
या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी शाहनवाज अखिल अन्सारी (३३) याला बुधवारी अटक केली आहे.
ठळक मुद्देरागात शाहनवाजने स्वयंपाकघरातील चाकूने वडील अखिल अन्सारी (५६) यांच्यावर वार करून पळ काढला.स्थानिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.