शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

खून, जबरी चोरीची उकल २४ तासात, पोलिसांना प्रशस्तीपत्र, एसपींच्या हस्ते सत्कार 

By प्रदीप भाकरे | Published: December 01, 2023 3:45 PM

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

अमरावती: तिवसा येथील सराफा व्यावसायिकाची हत्या करून त्यांच्या घरातून तब्बल ७५ लाख रुपयांचा ऐवज चोरून पळणाऱ्या मारेकऱ्यास अवघ्या २४ तासात जेरबंद करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी शुक्रवारी येथे झालेल्या क्राईम मिटिंगदरम्यान त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिवसा येथील सराफा व्यापारी संजय मांडळे हे घरी एकटे असतांना अज्ञात आरोपीने त्यांना ठार मारले होते. तथा घरातील सोने, चांदी व नगदी असा एकुण ७४,६८,००० रुपयांचा ऐवज देखील चोरून नेला होता. घटनेचे गांभिर्य पाहता पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उप-विभागीय पोलीस अधिकारी सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. 

स्थानिक गुन्हे शाखा, तिवसा पोलीस स्टेशन व सायबर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी रोशन दिगांबर तांबटकर (२५, रा. देऊरवाडा) याला गुन्हयात अटक केली. तथा त्याच्याकडून ७,७५,००० रुपयांचा माल जप्त करण्यात यश मिळविले. सीसीटिव्ही फुटेज व अन्य कुठलाही परिस्थितीजन्य पुरावा नसताना खाकीने २४ तासात मारेकरी पकडला. एसपींनी पत्रपरिषद घेऊन कामगिरी बजावणाऱ्यांना गौरविले जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार, १ डिसेंबर रोजी स्थानिक मंथन हॉलमध्ये झालेल्या गुन्हे बैठकीदरम्यान प्रशस्तीपत्र व पुष्प देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यांच्या पाठीवर पडली कौतुकाची थापएलसीबीचे पोलीस निरिक्षक किरण वानखडे, तिवसाचे ठाणेदार, प्रदीप ठाकुर, एलसीबीमधील सहायक पोलीस निरिक्षक सचिन पवार, सायबरचे किरण औटे, स्थानिक गु्न्हे शाखेतील उपनिरिक्षक नितीन चुलपार, संजय शिंदे, मुलचंद भांबुरकर, मो. तस्लीम, तिवसाचे पीएसआय राजेश पांडे या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. 

टीम एलसीबी, टीम तिवसाएलसीबीतील अंमलदार त्र्यंबक मनोहर, संतोष मुंदाणे, सुनिल महात्मे, बळवंत दाभणे, पुरुषोत्तम यादव, रविन्द्र बावणे, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, भुषण पेठे, युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, रविन्द्र व-हाडे, शांताराम सोनोने, निलेश डांगोरे, अमोल केन्द्रे, से. अजमत, शांताराम सोनोने, मंगेश लकडे, सचिन मसांगे, चंद्रशेखर खंडारे, पंकज फाटे, सुधिर बावणे यांच्यासह तिवसा पोलीस ठाण्यातील रोहित मिश्रा, अरविंद गावंडे, राजेश गावंडे, संतोष अढाऊ, सागर डोंगरे व सायबर पोलिस ठाण्यातील सागर धापड व सरिता चौधरी यांना गौरविण्यात आले. 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी