मडगाव - आपल्या अनैतिक संबंधात व्यत्यय येत असल्यामुळे आपला पती बसुराज बारकी याचा आपल्या मित्रांच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने खून करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोप असलेल्या कल्पना बारकी व तिचे अन्य तीन मित्र पंकज पवार, सुरेश सोळंकी व अब्दुल शेख यांच्या विरोधात दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी आरोप निश्चित करुन घेतले असून या प्रकरणात आपल्याला माफीचा साक्षीदार म्हणून सवलत मिळावी यासाठी अब्दुल शेख या आरोपीने न्यायालयात अर्ज केला आहे. या खून प्रकरणातील पाचवा संशयित अल्पवयीन असल्याने त्याच्यावरील खटला बाल न्यायिक मंडळासमोर चालणार आहे.अंगावर शहारे आणणारा हा खून मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात झाला होता. संशयित कल्पना हिचे पंकज, सुरेश व अन्य एकाशी अनैतिक संबंध होते. या संबंधात तिच्याकडून बाधा येत होती त्यामुळे आपल्या या मित्रांना घरी बोलावून दारुच्या नशेत असलेल्या आपल्या पतीचा दोरीने गळा आवळून खून करुन नंतर कटरने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते जंगलात फेकून देण्याचा आरोप या सर्वावर आहे. या चारही संशयितांविरोधात भा. दं. सं. च्या 302 (खून), 120-ब (कटकारस्थान) व 201 (पुरावे नष्ट करणो) या कलमाखाली आरोप निश्चित केले.वास्तविक या प्रकरणात यापूर्वी सुरेश सोळंकी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले होते. मात्र या खूनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा करुन अन्य एक संशयित अब्दुल शेख याने मुंबई उच्च न्यायालयात या सवलतीला आव्हान दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोप निश्चिती केल्यानंतर माफीचा साक्षीदार ही सवलत देण्यासंदर्भात नव्याने निर्णय घ्यावा असे नमूद करुन पुन्हा हा खटला सत्र न्यायालयाकडे पाठविला होता.पोलिसांच्या आरोपपत्रप्रमाणो, अब्दुल शेख याने केवळ मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर संशयितांना मदत केली होती. त्याचा फायदा घेऊन शेख याने आपल्याला माफीचा साक्षीदार करावा असा अर्ज केला आहे. सोळंकीचाही माफीचा साक्षीदारसाठी केलेला अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित असून उद्या 27 सप्टेंबर रोजी या दोन्ही अर्जावर न्या. पाटकर यांच्यासमोर युक्तीवाद होणार आहे.
अनैतिक संबंधास अडसर असलेल्या पतीची हत्या; पत्नीसह चौघांवर आरोप निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 6:04 PM
हत्या केल्यानंतर कटरने केले मृतदेहाचे तुकडे : एका संशयिताचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज
ठळक मुद्देआपल्या मित्रांच्या मदतीने अत्यंत थंड डोक्याने खून करुन नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोपसोळंकीचाही माफीचा साक्षीदारसाठी केलेला अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित असून उद्या 27 सप्टेंबर रोजी या दोन्ही अर्जावर न्या. पाटकर यांच्यासमोर युक्तीवाद होणार आहे.या चारही संशयितांविरोधात भा. दं. सं. च्या 302 (खून), 120-ब (कटकारस्थान) व 201 (पुरावे नष्ट करणो) या कलमाखाली आरोप निश्चित केले.