लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचा हट्ट धरणाऱ्या प्रेयसीची गळा दाबून हत्या करणाऱ्या प्रियकराला अजनी पोलिसांनी अटक केली. प्रेम ऊर्फ सोनू गणवीर (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो वैभव नगरात राहतो. सोनू ऑटोचालक आहे. तो गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. मृत तरुणीचे नाव आरती भलावी असून ती २३ वर्षांची होती. ३ वर्षांपासून आरोपी सोनूसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंधही प्रस्थापित झाले होते. तिने लग्नाचा हट्ट धरल्यामुळे सोनुने वाद घालून तिच्यासोबत सहा महिन्यापूर्वी प्रेमसंबंध तोडले होते. काही दिवसापूर्वी प्रेयसी रस्त्याने जात असल्याचे पाहून ऑटोचालक सोनूने तिला आपल्या ऑटोत बसवून घेतले. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा संबंध पूर्ववत झाले. गुरुवारी सायंकाळी सोनूने तिला तिच्या घराजवळून ऑटोत बसविले आणि फिरून येऊ असे सांगून तिला वैभव नगरातील एका पडक्या घरात नेले. तेथे त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर प्रेयसीने त्याच्याकडे पुन्हा लग्नाचा हट्ट धरला. यातून त्यांच्यात वाद झाला. सोनूने तिला मारहाण केल्यामुळे तिनेही हात उचलला. त्यामुळे आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली आणि तिथून पळून गेला.शुक्रवारी सायंकाळी पडक्या घरातून दुर्गंध सुटल्यामुळे एकाचे तिकडे लक्ष केले. त्याने घरात जाऊन पाहिले असता तरुणीचा मृतदेह आढळला. त्यामुळे त्याने आजूबाजूच्यांना सांगितले. नंतर अजनी पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तरुणीचा मृतदेह मेडिकलमध्ये पाठविला. दरम्यान, गुन्हेशाखेचे पथकही तेथे दाखल झाले. पोलिसांनी आजूबाजूला विचारणा केली असता दोन दिवसापूर्वी सोनू आॅटोवाला घरातून निघाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखा पोलिसांनी धावपळ करून रात्री १० च्या सुमारास सोनूला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने तरुणीचे नाव पत्ता सांगून शरीरसंबंध आणि हत्येची कबुली दिली.अहवालास उशीरतरुणीचा वैद्यकीय अहवाल येण्यास उशीर झाल्यामुळे अजनी पोलिसांनी रात्री या प्रकरणात सोनू गणवीरविरुद्ध हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार प्रदीप रायन्नावार या प्रकरणाची पुढील चौकशी करीत आहेत. आरोपी सोनुला पोलीस उद्या न्यायालयात हजर करून पीसीआरची मागणी करणार आहेत.
नागपुरात लग्नाचा हट्ट धरणाऱ्या प्रेयसीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:16 PM
लग्नाचा हट्ट धरणाऱ्या प्रेयसीची गळा दाबून हत्या करणाऱ्या प्रियकराला अजनी पोलिसांनी अटक केली. प्रेम ऊर्फ सोनू गणवीर (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो वैभव नगरात राहतो.
ठळक मुद्देहत्येपूर्वी शरीरसंबंध : आरोपी प्रियकर गजाआड