बारामती : सोमवारी (दि. १७) बारामती शहरातील सांस्कृतिक भवनसमोर झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मटका व्यावसायिक कृष्णा जाधव याचा खून केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांसह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : सोमवारी (दि. १७) रात्री ८.३० च्या सुमारास शहरातील सांस्कृतिक केंद्रासमोरील रस्त्यावर वैष्णवी ऊर्फ चिमी अशोक जाधव (वय १७, रा. कैकाड गल्ली, बारामती नेवसरोड, बारामती, जि. पुणे) ला मागील भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन आरोपीने तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यासह मानेवर, हातावर, चेहऱ्यावर धारदार लोखंडी कोयत्याने वार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. वैष्णवीला गंभीर जखम होती, म्हणून तिला पुढील औषधोपचारासाठी ससून रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. १८) रात्री ८ वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानुसार दाखल गुन्हयास भा. दं. वि. क. ३०२ हे कलम लावण्यात आलेले आहे. गुन्हयाच्या तपासात यातील वार करणाºया अल्पवयीन मुलाने पूर्वी नाना ऊर्फ कृष्णा महादेव जाधव याचा खून केल्याच्या कारणावरून वैष्णवीला मारण्यासाठी त्याचा साथीदार ओंकार शिवाजी जाधव (वय १९) याने आणखी एका अल्पवयीन साथीदारासह दुचाकीवरून (एमएच४२/एएल -८) वैष्णवीचा पाठलाग सुरू केला. यावेळी त्यांनी सॅकमध्ये दोन कोयते व सुरा बरोबर घेतला. त्यानंतर तिघे वैष्णवी हिच्या दुचाकीचा पाठलाग करीत बारामती येथील वसंतराव पवार नाट्यगृह सांस्कृतिक भवनासमोर आले. त्यावेळी वैष्णवी बसलेल्या दुचाकीला पहिल्या अल्पवयीन आरोपीने जोरात लाथ मारली. वैष्णवीला खाली पाडले. यावेळी त्या अल्पवयीन आरोपीला ओंकार शिवाजी जाधव याने त्याच्याजवळील असलेल्या सॅकमधून लोखंडी कोयता काढून दिला. त्या कोयत्याने अल्पवयीन आरोपीने वैष्णवी हिच्या डोक्यात, मानेवर, हातावर, चेहºयावर २८ वार केले. त्यादरम्यान सॅकमधील आणखी एक लोखंडी कोयता व सुरा अशी हत्यारे घेऊन ओंकार जाधव दुसºया अल्पवयीन आरोपीसह पळून गेला. ती हत्यारासह सॅक ओंकार जाधव याने नीरा डाव्या कालव्यामध्ये टाकून दिलेली असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.............
आरोपीला अटक : पाच दिवसांची कोठडीया गुन्हयातील आरोपी ओंकार जाधव (वय १८) याचा या गुन्हयात सहभाग दिसून आलेला आहे. त्याला गुरुवारी रात्री साडेदहाच्यादरम्यान अटक करण्यात आलेली आहे. त्यास शुक्रवारी (दि. २१) न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे सूक्ष्म मार्गदर्शन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी महत्त्वाचे ठरल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.