शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संपत्तीसाठी मुक्त विद्यापीठाच्या माजी कुलसचिवांची हत्या; मित्रानेच दगा दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 9:13 AM

नाशिकला धक्कादायक प्रकरण उघडकीस, व्यावसायिकाला ठोकल्या बेड्या

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) यांच्यासह त्यांचा पुत्र अमित कापडणीस (३५, दोघे रा. जुनी पंडित कॉलनी) यांची संपत्तीसाठी डिसेंबरमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून उघडकीस आली. २८ जानेवारीला हे पिता पुत्र बेेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने दिली होती. पोलिसांनी कापडणीस पिता-पुत्रांच्या हत्याकांडप्रकरणी मुख्य संशयित व्यावसायिक आरोपी राहुल गौतम जगताप (३६) यास बुधवारी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी राहुल यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

जगताप याने पिता-पुत्रांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये घेऊन जात पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. उच्चभ्रूंची वस्तीत असलेल्या शरणपूर रोडवरील जुन्या पंडित कॉलनीतील कापडणीस पिता-पुत्र काही वर्षांपासून एकटेच राहत होते. पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. एमबीबीएस झालेला अमित कापडणीस वैद्यकीय व्यवसाय करत नव्हता. दोघेही पिता-पुत्र एकाकी जीवन जगत होते.

..असा आहे घटनाक्रमकापडणीस यांची पत्नी, मुलगी काही महिन्यांपासून या पिता-पुत्रांच्या संपर्कात नव्हत्या. दरम्यान, भाऊ अमितचा फोन लागत नाहीव वडिलांचा फोन दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीकडे असून, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कापडणीस यांची कन्या शीतल यांनी नाशिक गाठले. त्यांनी पुन्हा नानासाहेब कापडणीस यांच्या मोबाईलवर फोन केला असता, संशयित राहुल याने तो उचलला आणि शीतल यांची भेट घेतली. त्याने शीतल यांना ‘बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे तुमचे वडील, भाऊ हे देवळाली कॅम्प येथील रो-हाऊसमध्ये शिफ्ट झाले आहे’ असे सांगितले. त्याच्या बोलण्याचा विश्वास ठेवत शीतल पुन्हा माघारी मुंबईला निघून गेल्या. यामुळे कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांपर्यंत उशिराने पोहोचली.

२८ जानेवारीला तक्रार२८ जानेवारीला कापडणीस यांची मुलगी पुन्हा नाशिकला आली. मात्र त्यांची वडील व भावाशी भेट होऊ शकली नाही, म्हणून त्यांना संशय आला व त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून पिता व भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. 

अन् असा आला जाळ्यातकापडणीस यांच्या खात्यातून शेअर्सची विक्री करून राहुलने जमा झालेली रक्कम काढल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच त्याच्या दुकानाचा मॅनेजर प्रदीप शिरसाठकडेही चौकशी केली. त्याच्या बँक खात्यावर नानासाहेब यांच्या खात्यावरून मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे वर्ग केली गेली होती.

थंड डोक्याने रचला कटकापडणीस यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राहुलने अमितसोबत मैत्री केली. त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता, बँक, शेअर मार्केट, डिमॅट खात्यातील गुंतवणुकीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्याने थंड डोक्याने हत्येचा कट रचला.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी