शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

धक्कादायक! राजस्थानमध्ये साधूची हत्या, ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला मृतदेह नदीकाठी सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 3:28 PM

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साधूची हत्या करुन मृतदेहाचे चार तुकडे करुन नदी काठावर फेकल्याचे समोर आले आहे.

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका साधूची हत्या करुन मृतदेहाचे चार तुकडे करुन नदी काठावर फेकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या हत्येसंदर्भात अजुनही पोलिसांनी माहिती मिळालेली नाही. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बारी उपविभागातील कांचनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुजाऱ्याची हत्या करण्यात आली होती. भीमगड येथे बुधवारी साधूच्या वेशात एका मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांचा जमाव तेथे जमा झाला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. कांचनपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ब्लँकेटमध्ये गुंडळलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. शेरखान भीमगढ असं त्या व्यक्तीच नाव आहे.  त्या व्यक्तीने काही महिन्यांपूर्वीच धर्मांतर केले असल्याची माहिती समोर आली आहे.

लग्न ठरल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड विरोधात तरूणीची पोलिसात तक्रार, 15 दिवसांवर आलं होतं तिचं लग्न

गेल्या अनेक वर्षांपासून तो व्यक्ती एका मंदिरात पूजा करत होता. मंदिरा जवळच एक गुहा आहे. त्यात काही संतांचे वास्तव्य असायचे. तो साधू घटनास्थळावरून बेपत्ता झाला तेव्हा पासूनच हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भावुद्दीन रविवारपासून मंदिरातून बेपत्ता होता. गावातील त्याचे कुटुंबीय त्याला रोज चहा द्यायला जायचे. मात्र रविवारपासून तो गायब होता.

तो व्यक्ती बेपत्ता झाल्याची बातमी गावात पसरल्याने गावकऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी बराच वेळ शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही शोध  लागला नाही. बुधवारी सकाळी गावकरी पुन्हा जमा होऊन शोध घेऊ लागले. बामणी नदीच्या पात्रात असलेल्या नाल्यात मृतदेह पाण्याजवळ पडलेला आढळून आला. घटनेनंतर कांचनपूरचे एसएचओ हेमराज शर्मा यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस