पलक्कड : केरळच्या पलक्कडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. श्रीनिवासन असे त्यांचे नाव असून, हल्लेखाेरांनी त्यांच्यावर त्यांच्या दुकानातच हल्ला केला. सहा हल्लेखाेरांची टोळी दुचाकींवरून आली हाेती. त्यांनी श्रीनिवासन यांच्यावर तलवारीने २० वेळा वार केले.
श्रीनिवासन यांच्या हत्येच्या काही तासांपूर्वी जवळच्या एका गावात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका नेत्याची हत्या करण्यात आली हाेती. श्रीनिवासन यांच्या हत्येमागे या संघटनेच्या राजकीय शाखेचा हात असल्याचा आराेप भाजपने केला आहे.