नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस येथे नळपाणी योजनेची पाइपलाइन टाकण्याच्या कामात अडथळा ठरत असलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीची ऐनघर कुटुंबातील सदस्यांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे आणि ते जंगलात पळून गेले होते. पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात याप्रकरणी ११ जणांना अटक केली असून, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण कर्जत तालुका हादरला आहे.
कर्जत तालुक्यातील खांडस गावात नळपाणी योजनेचे पाइपलाइन टाकण्यावरून शिवाजी पाटील यांनी हरकत घेतली होती. या ठिकाणी आपल्याला घर बांधायचे असून पाइपलाइन टाकू नका, अशी सूचना पाटील यांनी केली. त्यामुळे पाइपलाइनचे काम करणाऱ्या ऐनकर कुटुंबाला याचा राग आला. या सर्वांनी ४ मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवली आणि पाइपलाइन टाकायला हरकत घेणारे शिवाजी पाटील यांना मनोहर ऐनकर, जनार्दन ऐनकर, विठ्ठल ऐनकर, प्रकाश ऐनकर, बाळाराम ऐनकर आणि पुंडलिक ऐनकर यांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण सुरू असताना विलास ऐनकर याने लोखंडी टिकावाच्या साहाय्याने तर मच्छींद्र ऐनकर यांनी फावड्याने शिवाजी गोविंद पाटील यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली. कैलाश ऐनकर आणि जगदीश ऐनकर या दोघांनी चाकूने शिवाजी पाटील यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले आणि शेवटी गणेश ऐनकर याने डोक्यात तलवारीने घाव घातला आणि सर्व जण फरार झाले.
या मारहाणीमुळे शिवाजी पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना त्यांचे वडील गोविंद पाटील यांनी मुलाला उचलून खांडस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात नेले; परंतु प्रचंड रक्तस्रावामुळे खांडस प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, पनवेलकडे जाताना रस्त्यातच शिवाजी यांचा मृत्यू झाला.आरोपींना पकडण्यात नेरळ पोलिसांना यशघटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस खांडस गावात पोहोचले. तेव्हा जखमीला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, जखमी शिवाजी पाटील यांचा या हाणामारीत मृत्यू झाला असल्याचे पोलिसांना समजले. खून करून पळालेल्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवातके ली.४ मेच्या रात्री तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर ५ मे रोजी दिवसभरात सर्व ११ जणांना पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे.