ठाणे : खारेगाव रेल्वे फाटकाजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार अवघ्या १२ तासात कळवा पोलिसांनी या हत्येप्रकरणतील तीघा आरोपींना अटक केली आहे. केवळ दारु पिण्याच्या पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणी आकाश किसन पळस (२०), रा. कसबे चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, सनि धनु सोनकर (२३), रा. पाटील चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व, फैजल फयाज खान (२४) रा. हिंदवासनी चाळ, इंदिरानगर, कळवा पुर्व यांना अटक करण्यात आले आहे. ३ डिसेंम्बर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास नियंत्नण कक्ष ठाणे येथे एका दक्ष नागरिकाने फोन करून एक जण खारेगाव फाटक जवळ जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. त्यानुसार कळवा पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी अनोळखी इसमास काही अज्ञात जणांनी मारहाण करून जिवे ठार मारले असल्याचे समोर आले. या प्रकरणी अज्ञात मारेक:यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील अनोळखी मयत इसम व अज्ञात आरोपीत यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार करण्यात येऊन प्रथम या मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी अवघ्या काही तासात मयत व्यक्तीची ओळख शोधून काढली. मयत व्यक्तीचे नाव गुलाब सलामत शेख (२२), रा. श्रीकृष्ण चाळ, इंदिरानगर, दुर्गा माता मंदिराजवळ, कळवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अतिशय सखोलपणो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे विचारणा करु न आरोपीतांचे वर्णन प्राप्त करून आरोपीतांची नावे निष्पन्न केली. तसेच तांत्नीक माहितीच्या आधारे तिघा मारेक:यांना अवघ्या १२ तासात अटक केली. आरोपींकडे सखोल तपास केला असता, आरोपी व मयत इसम यांच्यात दारू पिण्याच्या पैशाच्या कारणावरून वादावादी होवुन त्यांनी मयत इसमास लोखंडी पाईपने मारहाण करून जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. तिघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.