मडगाव - मालमत्तेच्या वादातून दोन भावांमध्ये भांडण होउन त्यात जखमी झालेला बेर्नाडो फेरेरा (56) याचे आज सकाळी गोव्यातील गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात मृत्यू झाला. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनीखूनाचा गुन्हा नोंद करुन मयताचा लहान भाउ संशयित ङोवियर फेरेरा (51) याला अटक केली आहे. संशयिताला अधिक तपासासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
फातोर्डा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदाचा सदया ताबा मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर हे पहात आहे. लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश गडेकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ङोवियर याच्यावर भारतीय दंड संहितेंच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
12 मे रोजी बोर्डा येथे मारहाणीची ही घटना घडली होती. बेनार्ड व ङोवियर हे बोर्डा येथे एकमेकांच्या शेजारी रहात असून, मालमत्तेवरुन उभयंतांमध्ये वाद होता. त्यावरुन दोघांमध्ये वारंवार खटकेही उडत होते. ङोवियर याने बेनार्ड याच्या डोक्यावर जळावू लाकूड हाणले होते. त्यात बेनार्ड हा गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला गोवा वैदयकीय महाविदयालयाच्या इस्पितळात दाखल केले होते. आज बुधवारी सकाळी तेथे त्याचे निधन झाले. त्यानतंर फातोर्डा पोलिसांनीखूनाचा गुन्हा नोंद करुन ङोवियर याला ताब्यात घेतले व नंतर रितसर अटक केली.