यवतमाळ : शहरालगतच्या भिसणी जंगलात मंगळवारी दुपारी एका युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. यानंतर शहर पाेलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता ही खूनाची घटना असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानने युवकाच्या दुचाकीपर्यंतचा माग दाखविला. घटनास्थळावरिल परिस्थितीवरून पट्टाने गळा आवळून खून केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाेलिसांनी या प्रकरणी एका संशयीत महिलेला ताब्यात घेतले आहे. शब्बीर जुम्मा लालणवाले (२८) रा. जामडाेह असे मृताचे नाव आहे. त्याचा अनैतिक संबधातून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शब्बीर हा एका महिलेसाेबत भिसणी जंगलात आला. त्याने दुचाकी रस्त्यावरच उभी ठेवली हाेती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेले अज्ञात मारेकरी घटनास्थळी पाेहाेचले असावे, त्यांची घटनास्थळावर झटापट झाली. यात महिलेच्या हातातील बांगड्या फुटल्या त्या घटनास्थळावर पडून आहे. शब्बीर कमर पट्टाने गळा आवळून ठार केले. ताे पट्टाही घटनास्थळावर आहे. खून झालेले ठिकाण ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या हद्दित येत असल्याने या प्रकरणी ग्रामीणी पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू हाेती. या गुन्ह्याशी संबंधीत महिलेला संशयावरू शहर पाेलिसांनी ताब्यात घेतले. शहर ठाणेदार धनंजय सायरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. येथे श्वान पथकाला पाचारण करण्यात आले हाेते. श्वानाने खूनाच्या स्थळापासून दुचाकीच्या रस्त्यापर्यंतचा मार्ग दाखविला, नंतर श्वान जागेवर घुटमळले. लवकर या गुन्ह्यातील आराेपींचा शाेध लागले अशी शक्यात पाेलिसांनी वर्तविली आहे.