Shraddha Murder Case : मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आरोपी आफताब पुनावाला अटकेत आहे. यामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपीच्या चौकशीतुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अवयवाचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक अवयव जंगलात फेकले. यामागे त्याने अनेक कबुली जबाब दिले आहेत. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आफताबने काय काय सांगितले बघुया
१. श्रद्धाच्या हत्येची योजना त्याने एक आठवड्यापुर्वीच केली होती
२. एक आठवड्यापुर्वी त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर तिचा खून करण्याचे त्याने ठरवले. मात्र श्रद्धा भावुक झाली आणि त्याने मन बदलले.
३. श्रद्धा आफताबवर संशय घ्यायची, त्याचे इतरांशी फोनवर बोलणे तिला आवडायचे नाही. यामुळे त्यांच्यात खटके उडायचे.
४. १८ मे रोजी त्यांच्यात भांडण झालं आणि त्याच दिवशी आफताबने तिची हत्या केली.
५. हत्या केल्यानंतर तो खूप घाबरला होता. त्याला माहित होते की जर त्याने मृतदेह असाच पुरला तर लगेच पकडला जाईल. यामुळे मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी हे इंटरनेटवर रात्रभर सर्च केले.
६. मृतदेहाला कसे चिरतात हे त्याने इंटरनेटवर पाहिले.
७. त्याला क्राईमच्या वेब सीरीज बघायला आवडतात. त्या सीरीज बघुनच त्याने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. श्रद्धाच्या इन्स्टाग्रामवरुन सतत काही ना काही पोस्ट करत राहिला.
८. हे कृत्य त्याने एकट्याने केले यामध्ये इतर कोणाचाच सहभाग नव्हता
९. मृतदेहाचा वास येईल म्हणून त्याने आतड्यांची विल्हेवाट लावली आणि मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला
१०. यासाठी त्याने एक फूट लांब सुरीचा उपयोग केला होता